पुराव्याचा तगादा न लावता दाखले द्या, जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 12:49 AM2019-08-03T00:49:50+5:302019-08-03T00:49:54+5:30

तमनाथ व शिरसे वाडीत ज्या कातकरी कुटुंबांना आतापर्यंत रेशन कार्ड मिळाले नाहीत

Submit proofs without supporting evidence, DM of karjat | पुराव्याचा तगादा न लावता दाखले द्या, जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांना सूचना

पुराव्याचा तगादा न लावता दाखले द्या, जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांना सूचना

googlenewsNext

कर्जत : आदिवासीवाडीत राहणा-या नागरिकांकडे पूराव्याचा तगदा न लावता कमीत कमी व सहज उपलब्ध होतील अशा पूराव्याच्या आधारे वाडी वस्तीवर आमच्या प्रशासनाच्यावतीने रेशन कार्ड, आधार कार्ड पोहचवीले जातील असे आश्वासन जिल्हाधीकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

तमनाथ व शिरसे वाडीत ज्या कातकरी कुटुंबांना आतापर्यंत रेशन कार्ड मिळाले नाहीत अशा कुटुंबांना पुढील आठ दिवसात रेशन कार्ड बनवून देण्याचे आदेश त्यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत. १ आॅगस्टच्या महसूल दिनाचे औचित्य साधून तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने कर्जत तालुक्यातील तमनाथ आदिवासीवाडीमध्ये कातकरी उत्थान अभियाना अंतर्गत जातीचे दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधाकारी बोलत होते.

ग्रामपंचायत शिरसे व संतोष भोईर मित्र मंडळाच्या वतीने ५,६ व ७ जुलै रोजी तमनाथ येथे कातकरी उत्थान अभियानामार्फ त विविध शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्राप्त झालेल्या कातकरी कुटुबांच्या जातीच्या दाखल्याच्या अर्जावर कार्यवाही करून तयार केलेले व लँमीनेशन केलेले जातीचे दाखले वाटपाचे शिबीर १ आॅगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून तहसील कार्याल, दिशा केंद्र व शिरसे ग्रामपंचायतीने आयोजन के लेहोते.

तहसीलदारांच्या कामाचा विशेष उल्लेख
कर्जत तालुक्यात कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या रेशन व इतर योजनाच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या कामाचा उपस्थित महिलांनी विशेष उलेख के ला.सीता पवार म्हणाल्या की, तहसीलदारांनी मागच्या वर्षी व यावर्षी आमच्या भागात दाखले वाटपाचे कँम्प केले आहेत, काही लोकांना तर एका दिवसात सुध्दा रेशन कार्ड दिले आहेत.
 

Web Title: Submit proofs without supporting evidence, DM of karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.