सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनचा प्रस्ताव सादर; १६६ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 10:45 PM2019-11-01T22:45:51+5:302019-11-01T22:46:16+5:30

महाड औद्योगिक वसाहतीमधील नव्या पाइपलाइननंतर प्रदूषण थांबण्याचा दावा

Submit a proposal for a sewage pipeline; 3 crore proposal | सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनचा प्रस्ताव सादर; १६६ कोटींचा प्रस्ताव

सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनचा प्रस्ताव सादर; १६६ कोटींचा प्रस्ताव

Next

सिकंदर अनवारे

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी सामाईक सांडपाणी प्रकल्पातून आंबेतमध्ये सोडण्यासाठी जवळपास १६६ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. या कोट्यवधीच्या योजनेनंतरही खाडीतील प्रदूषण थांबेल का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महाड एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी येथील सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून आंबेतमध्ये सोडण्याची शासनाची योजना होती. मात्र, सध्या हे पाणी ओवळे गावापर्यंत पाइपलाइन नेऊन या ठिकाणीच सोडण्यात येत आहे. यामुळे या परिसराला प्रदूषणाचा फटका बसला आहे. वारंवार मागणी केल्यानंतर एनआयओ यांनी पुन्हा सर्व्हे केला आणि सध्या सुरू असलेल्या लाइनपासून अडीच किलोमीटर पुढे गोमेंडी या गावापर्यंत पाणी नेऊन सोडण्याचा सर्व्हे केला. सध्या असलेली पाइपलाइन ही फार जुनी झाली आहे. याचा बदलण्याचा प्रस्ताव महाड औद्योगिक क्षेत्रातून ३० जानेवारी २०१९ ला १६६ कोटींचा प्रस्ताव तयार करून वरील कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. सध्या सोडण्यात येणारे पाणी ज्या ठिकाणी सोडले जाते, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि फेसाळलेले आहे. नवीन टाकण्यात येणाºया पाइपलाइनमुळे ही दुर्गंधी किंवा फेसाळपणा दूर होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवीन पाइपलाइनच्या प्रस्तावामध्ये दोन ठिकाणी नियंत्रण केंद्र हे बसवण्यात येणार आहे. महाड एमआयडीसीच्या म्हणण्यानुसार या नियंत्रण केंद्रामुळे सध्या होत असलेल्या प्रदूषणाला आळा बसणार आहे. जुनी लाइन ही ६ ७ ३० ची असून, नवीन होणारी पाइपलाइन ७७१० ची होणार आहे. त्यामुळे खाडीमध्ये घातक रसायन प्रवाह मोठ्या प्रमाणात होणार आहे. सध्या असलेली पाइपलाइन जरी जुनी असली तरी चांगल्या स्थितीत आहे. नवी होणारी ही पाइपलाइन त्याच ठिकाणी जाऊन थांबणार आहे. त्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल का? यावर संभ्रम निर्माण झाला आहे.

पाइपलाइनमध्ये अशा कोणत्याही प्रकारचा मैला साचून दुर्गंधी किंवा फेसाळ पाणी होत नाही. यामुळे नवीन होणाºया लाइनवर जे नियंत्रण केंद्र बसवण्यात येणार आहे. त्याने या प्रदूषणाला आळा बसणार आहे. या नव्या प्रस्तावानुसार या योजनेत नियंत्रण कक्ष, एचडीपी पाइपलाइन याचा समावेश करण्यात आला आहे. याकरिता १६६ कोटी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. एकूण २४ कि.मी. मध्ये ही पाइपलाइन केली जाणार आहे. पाइपलाइन तसेच नियंत्रण कक्ष पर्यावरणाची संभाव्य हानी टाळणार आहे.- पी. एस. ठेंगे,
उपअभियंता, एमआयडीसी

आंबेत खाडी रासायनिक सांडपाण्यामुळे झाली प्रदूषित; मैला साचल्याने दुर्गंधी
पूर्वी ही पाइपलाइन आंबेत खाडीपर्यंत पोहोचणे गरजेची होती, असे न होता ओवळेपर्यंतच नेऊन सोडल्याने मोठ्या प्रमाणात खाडी प्रदूषित झाली आहे. आता होत असलेल्या प्रदूषणावर मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा सीईटीपी कोणीही बोलण्यास तयार नाही.
सीईटीपीच्या म्हणण्यानुसार लाइन जुनी असल्याने या लाइनमध्ये मोठ्या प्रमाणात मैला साचला असून वाहणाºया पाण्यासोबत मैला जात असल्याने दुर्गंधी येत असून खाडीचे पाणी फेसाळत आहे.

Web Title: Submit a proposal for a sewage pipeline; 3 crore proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड