अलिबाग - अलिबाग तालुक्यांतील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गावांच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना गेल्या पौर्णिमेच्या दिवशी समुद्रास आलेल्या मोठया भरतीच्या उधाणाणो पडलेली एकूण 25 ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), गेल्या तीन दिवसांपासून तब्बल 56 स्त्री-पुरुष शेतक-यांनी अथक श्रमदान करुन चिखलमातीने बुजवून संरक्षक बंधा-यांची दुरुस्ती करण्यात यश मिळविले असून आता येत्या गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजीच्या अमावास्येला येणा-या मोठया उधाणाच्या भरतीचे पाणी शेती पार करुन ग्रामस्थांच्या घरात घूसण्याच्या मोठया आपत्तीपासून आपल्या गावांचा बचाव करण्यात हे सर्व ग्रामस्थ शनिवारी संध्याकाळी यशस्वी झाले आहेत.
गेल्या पौर्णिमेला गावांच्या समुद्र संरक्षक बंधा-यांना तब्बल 25 ठिकाणी ही मोठी भगदाडे पडून समुद्राचे खारेपाणी गावच्या भातशेतीत घूसून पूढे गावांत घरांच्या जोत्यांपर्यत पोहोचल्याने मोठया आपत्तीस सर्व ग्रामस्थांना सामोरे जावे लागले. या 25 भगदाडांमध्ये चिखलमाती भरुन ती बुजवून संरक्षक बंधा-यांची दूरुस्ती केली नाही तर येत्या गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजीच्या अमावास्येला येणा-या मोठय़ा उधाणाच्या भरतीचे पाणी याच 25 भगदाडांतून थेट घूसून पूढे शेती पार करुन ग्रामस्थांच्या घरात घूसून मोठय़ा आपत्तीस सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.आपल्याला वाचायचे असेल तर श्रमदानाला या..या गंभीर परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर नेमकी नैसर्गीक समस्या व शासकीय तांत्रीक मर्यादा लक्षात घेऊन शहापूर गावातील ज्येष्ठ शेतकरी व गाव प्रमुख अमरनाथ विश्वनाथ भगत.,महादेव सीताराम थळे रामचंद्र भोईर यांनी संपूर्ण गावांला एकत्न करून ‘आपल्याला वाचायचे असेल तर, कुणावर अवलंबून न राहता प्रत्येक घरातील एक पुरु ष व महिला यांनी फूटलेल्या संरक्षक बंधा:यांची दुरुस्तीसाठी (खांडी बुजविण्यासाठी)गुरुवार पासून येण्याचे आवाहन केले. त्यास सर्व ग्रामस्थ शेतक:यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गावाच्या पूर्वे कडील बाजूस असलेल्या भंगार कोठ्यातील भगदाडे गुरुवारी श्रमदान करुन बांधुन काढण्यास प्रारंभ आणि या सामुहिक श्रमदानास प्रांरभ झाला. अणि तिन दिवसांच्या अथक कष्टाअंती तिस:या दिवशी शनिवारी संध्याकाळी ही 25 मोठी भगदाडे बुजवून संरक्षक बंधारे दुरुस्त करण्यात यश मिळाले असल्याची माहिती अमरनाथ विश्वनाथ भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
संरक्षक बंधा-यांच्या25 भगदाडांच्या मोजमाप नोंदीशहापूर-धेरंड गावांच्या पूर्व व पश्चिम भागाकडील संरक्षक बंधारे एकूण 25 ठिकाणी फूटले होते.या सर्व 25 भगदाडांची मोजमापे गावांतील तरुण शेतक:यांनी मोजून घेवून त्यांच्या नोंदी करुन ठवल्या आहेत. श्रमदानाने ही भगदाडे बुजवल्यावर देखील दुरुस्तीची मोजमापे देखील घेवून त्यांच्याही रितसर नोंदी करुन ठेवल्या असल्याचे श्रमीक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयत राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले.