सरत्या वर्षात गुन्हेगारीला आळा घालण्यात रायगड पोलिसांना यश

By निखिल म्हात्रे | Published: December 30, 2022 06:38 PM2022-12-30T18:38:47+5:302022-12-30T18:39:42+5:30

रायगड जिल्ह्यात 28 पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, खुन, सोशल मिडीया, लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक, मारामारी दरोडा सारख्या घटना घटल्या होत्या.

Success of Raigad Police in curbing crime during the last year | सरत्या वर्षात गुन्हेगारीला आळा घालण्यात रायगड पोलिसांना यश

सरत्या वर्षात गुन्हेगारीला आळा घालण्यात रायगड पोलिसांना यश

googlenewsNext

अलिबाग - रायगड जिल्ह्यात 28 पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, खुन, सोशल मिडीया, लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक, मारामारी दरोडा सारख्या घटना घटल्या होत्या. या घटनांमुळे रायगड जिल्हा होरपळून निघाला असला तरी 70 टक्के प्रकरणात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. तसेच पर राज्यातील आरोपींचे धागेदोरे शोधण्यात यश आले आहे. तर दुसरीकडे रायगड पोलिस दल महाराष्ट्र राज्यात डायल 112 या दुसरा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. त्यामुळे रायगड पोलिसांचे कर्तव्यावर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे.

11 वर्षांनी क्रिडा स्पर्धेत पोलिसांना घवघवित यश 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पार पडलेल्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत रायगड जिल्हा पोलीस दलाने पदकांचे शिखर सर करीत “सर्व-साधारण विजेते पदावर ” आपले नाव कोरले आहे. कोकण परिक्षेत्रातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे ग्रामीण, पालघर व नवी मुंबईच्या पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी सांघिक तसेच वैयक्तीक खेळ प्रकारात आपली कुमक दाखवित आपला सहभाग नोंदविला. क्रिडा स्पर्ध्देतील सांघिक प्रकारामध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅन्डबॉल,कबड्डी, खो-खो, क्रॉसकंट्री तसेच वैयक्तीक प्रकारामध्ये कुस्ती, ज्युदो, वेट-लिफ्टींग, जलतरण, बॉक्सींग,अॅथलेटीक्स, वू-शो, त्वायकांदो अशा वैयक्तीक खेळ प्रकारांचा समावेश होता.

रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे ७ पोलीस अधिकारी व ११९ पोलीस अंमलदार यांनी आपल्या कामगिरीमध्ये चमक दाखवित सांघिक खेळ प्रकारात ८ पैकी ७मध्ये प्रथम व १ व्दितीय क्रमांक प्राप्त केले तसेच वैयक्तीत खेळ प्रकारामध्ये १३३ सुवर्ण पदक, ५७ रजतपदक, ५७ कांस्य पदकांच्या कमाई अशा एकुण २२४ गुणांसह रायगड जिल्हयाने सर्व-साधारण जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

घर फोडीच्या घटना 

घरफोडी आणि चोरीच्या घटनांसोबत जबरी चोरीच्या घटनांनी हैराण करून सोडले होते. जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या त्यामधील काही उघड करण्यात आल्या आहेत. तर घर फोडीच्या जिल्ह्यात 355 घटना घडल्या आहेत. यामध्ये 232 तपासावर प्रलंबीत आहेत, तर 1 वर्ष कालावधी वरील तपासावर 23 प्रलंबित आहेत.

दरोड्याचा 21 घटना - 

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लहान मोठ्या 21 दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर तपासाला गती मिळाली आणि काही दरोड्याचे गुन्हे उघड झाले आहेत. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खून, बलात्कार, छेडछाड, अपघात, दहशतवादी कारवाया, नैसिर्गक आपत्ती इत्यादी प्रसंगी त्वरीत पोलीस मदत व्हावी, याकरिता प्रतिसाद मोबाईल अॅप्लीकेशन सुरू करण्यात आले आहे.

15 लाखाचा गांजा 

जिल्ह्यातील गांज्याचे समुळे नष्ट करण्यासाठी पोलिस विभागाने कंबर कसली होती. आपल्या नजीकच्या परिसरात छुप्या पध्दतीने सुरु असलेल्या गावठी दारु , गांजा, चरस व इतर अंमली पदार्थाच्या विक्रेत्या व पुरवठादाराबाबत माहिती असल्यास किंवा मिळाल्यास तात्काळ त्याबाबतची  माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला अगर पोलीस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन रायगड पोलीस दलामार्फत  करण्यात आले आहे.  

गुटरवाही पकडला

ग्रामिण भागासह शहरात ठिकठिकाणी कारवाई करुन लोकल पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लाखो रुपयांचा गुटखा पकडून तो नष्ट देखील केला. त्यासाठी छापे टाकण्यात आले. दुकानांवर धाड देखील टाकली. तसेच पोलिसांनी केलेल्या सतत कारवाई सत्रामुळे आता गुटका विकणाऱ्यांनाही चाप बसला आहे.

वाहनांवर कारवाई 

मोटार अपघातांचे वाढते प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने दुचाकी वाहने चालवितांना योग्यती खबरदारी व मोटार वाहन कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. दुचाकी चालवितांना हेल्मेट परिधान न केल्याने बहुतांशी अपघातांमध्ये दुचाकीस्वार हे मरण पावलेले आहेत. त्यामुळे संबंधित मरण पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबावर आघात झालेले असून, त्यांचे कधीही न भरून येणारे नुकसानही झालेले आहे. म्हणूनच दुचाकीस्वारांना आता हेल्मेट सक्तीचे करण्यात आलेले आहे. हेल्मेट सक्तीबरोबरच दुचाकीवरून एकाचवेळी तिघांनी बसून प्रवास करण्यालाही बंदी घातलेली असून, यापुढे दुचाकीवरून तिघांना प्रवास करता येणार नाही. या नियमाला डावळून प्रवास केल्यास अशांच्या विरोधात मोटार वाहन कायदा कलम 129, 177 अन्वये कारवाई होणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

10 लाचखोर गजाआड 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून 10 लाचखोरांना तुरुंगाची हवा खाऊ घातली आहे. त्यांचे देखील काम अजून सुरु आहे. त्यासाठी या विभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्पर आहेत.

Web Title: Success of Raigad Police in curbing crime during the last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.