- जयंत धुळप अलिबाग : स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरच्या थंड हवेत आणि लालमातीतच होते, असे मानले जाते. परंतु अलिबाग तालुक्यातील खानाव येथील तरुण शेतकरी केतन पाटील यांनी आपल्या शेतातील काळ्या मातीत गेल्या तीन वर्षांपासून स्ट्रॉबेरीची लागवड करून स्ट्रॉबेरीचे उत्पादन खाºया हवेत आणि काळ्या मातीतही होऊ शकते, हे सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही रासायनिक खतांशिवाय संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने त्यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे.समाज माध्यमांद्वारे त्यांनी महाबळेश्वरमध्ये केली जाणारी शेती पाहिली. त्यानंतर, त्यांनी यू-ट्यूबवरून स्ट्रॉबेरी झाडांची लागवड, मशागत आणि उत्पादन कसे घ्यायचे, याबाबत माहिती मिळविली. तीन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी स्ट्रॉबेरीच्या १० ते १५ झाडांची आपल्या शेतात लागवड करून मशागत केली. त्यांना चांगली फळे आली, त्यातून त्याचा उत्साह वाढला आणि दुसºया वर्षी त्यांनी पावसाळा संपल्यावर नोव्हेंबरमध्ये स्ट्रॉबेरीच्या ५० झाडांची लागवड केली. डिसेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची फळे येण्यास प्रारंभ झाला. एकूण पंधरा ते वीस किलोंच्या आसपास स्ट्रॉबेरीची फळे आली. त्यातून त्यांचा हुरूप वाढला आणि नोव्हेंबर, २०१८ मध्ये त्यांनी स्ट्रॉबेरीची तब्बल ५०० रोपे लावून चांगली मशागत केली. डिसेंबर अखेर आणि जानेवारी, २०१९च्या प्रारंभास स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले. दररोज सुमारे दीड ते दोन किलो उत्पादन मिळत असल्याचे केतन पाटील यांनी सांगितले.तीन महिने घेता येईल उत्पादनमहाबळेश्वर पाचगणीमध्ये बाराही महिने स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. तसे आपल्याकडे शक्य होणार नाही, परंतु पावसाळा संपल्यावर नोव्हेंबर ते जानेवारी या थंडीच्या तीन महिन्यांत चांगले उत्पादन घेता येऊ शकते. समुद्रकिनाºयाच्या खाºया हवेत स्ट्रॉबेरी होऊ शकते, हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे. मात्र, थंड हवामान राखण्याकरिता कृत्रिमरीत्या व्यवस्थापन करावे लागले, असाही अनुभव त्यांनी सांगितला.नफ्यातील शेतीचा आगळा वस्तुपाठकेतन यांनी २७ एकर शेतीवर स्ट्रॉबेरीसह विविध कृषी उत्पादनांचे प्रयोग केले. अलिबागच्या पांढºया कांद्यासह लाल कांद्याचे उत्पादन गेली अनेक वर्षे घेत आहेत. आंब्याच्या हापूस, पायरीसह विविध दहा जातींची ५००पेक्षा अधिक झाडे त्यांनी जोपासली आहेत. टरबूज, वांगी, नवलकोल, अॅपल बोर, कोबी, मिरची, काकडी, राई, मटार, वाल अशा फळभाज्या बारा महिने घेण्याचा प्रयोग यशस्वी करून तालुक्यात नफ्यातील शेतीचा आगळा वस्तुपाठ घालून दिला.
कोकणच्या खाऱ्या हवेत स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 5:41 AM