फुलांच्या शेतीतून शोधली स्वयंरोजगाराची यशस्वी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:13 AM2021-03-03T00:13:34+5:302021-03-03T00:13:47+5:30

मुरूड तालुक्यातील रामदास पाष्टे यांचे यश

Successful wait for self-employment discovered from floriculture | फुलांच्या शेतीतून शोधली स्वयंरोजगाराची यशस्वी वाट

फुलांच्या शेतीतून शोधली स्वयंरोजगाराची यशस्वी वाट

Next



राजीव नेवासेकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्ली-मांडला : मुरूड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील काजूवाडी येथील शेतकरी रामदास पांडुरंग पाष्टे यांनी परिस्थितीवर मात करून शेतात तीन गुंठे क्षेत्रात फुलांची शेती फुलवून स्वयंरोजगाराची यशस्वी वाट शोधली आहे. यासाठी त्यांंचे कौतुक होत आहे. 
तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या दुर्गम भागात रामदास पाष्टे यांनी फणसाड धरणाच्या जवळ काजूवाडीतील आपल्या शेतातील  तीन गुंठे क्षेत्रात झेंडू (गोंड्याची) फुलांची व तीन गुंठे जमिनीत शेवंती पिकविली असून, तीन गुंठ्यांत मका, एका गुंठ्यात भुईमूग व एक गुंठ्यात रताळीचे पीक घेतले आहे. त्यांनी २०१६ मधे अलिबाग-वाडगाव येथील नातेवाईक महादेव पाष्टे यांच्याकडून शेवंतीची तीनशे रोपे आणून लावली होती. २०१७ मध्ये नंतर एक गुंठ्यात रोपे लावली. हीच रोपे जागेत तयार करून यंदा तीन गुंठ्यांत रोपे लावण्यात आली आहेत. या रोपांची लागवड सरासरी ऑगस्ट महिन्यात केली जाते व डिसेंबर महिन्यात उत्पन्न मिळते. यंदा फुलशेती बहरली; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन, तीन जून रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे फळभाजीपाला व्यवसायावर परिणाम झाला आहे. चांगली मशागत व मेहनत यामुळे चांगले उत्पादन मिळविले आहे. त्यांनी तीन गुंठे जागेत शेवंतीची व तीन गुंठे झेंडूची (गोंड्याची) तीन गुंठे मका लावला. एक गुंठे जागेत भुईमूग तर एक गुंठ्यात रताळी लावली आहे. 
तीन महिन्यांनंतर त्यांना दिवसाकाठी चांगल्याप्रकारे रोजगार मिळाला आहे. शेतात फळभाजीपाला पीक घेताना त्यांनी शेतात रासायनिक खतांचा वापर न करता यासाठी शेतातच ६×१० चा खड्डा तयार करून त्यात पालापाचोळा व शेणाचा वापर करून सेंद्रिय खत तयार केले. परिणामी दोन महिन्यांनंतर फुलांच्या शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. 

बागायतदार शेतकऱ्यांनी नारळ, सुपारी, आंबा पिकाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात फुले, कांदा, मका व रताळी लागवड करून अंतर्गत पीक घेतल्यास स्वयंरोजगाराची वाट खुली होऊ शकते. 
- रामदास पाष्टे, 
शेतकरी

Web Title: Successful wait for self-employment discovered from floriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.