पेण भोगावती नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ, दोन तरूण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 09:02 PM2018-06-21T21:02:29+5:302018-06-21T21:02:29+5:30
- जयंत धुळप
पेण- पेण तालुक्यांतील पेण जवळील भोगावती नदीचे पाणी संततधार पावसामुळे अचानक वाढल्याने संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नदी पार करुन पलिकडच्या किनार्यास जाणारे सागर वाघमारे(२२,रा.धावटेवाडी,पेण) आणि अनिकेत वाकसर(२२,कोळावाडा,पेण) हे दोघे तरुन पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जावून बेपत्ता झाले असल्याची माहिता जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमत शी बोलतान दिली आहे.
बेपत्ता झालेल्या दोघा तरुणांचा शोध घेण्याकरिता बचाव पथक घटनास्थळी तत्काळ रवाना झाली असून शोध कार्यास प्रारंभ झाला आहे. पेण उप विभागीय महसुल अधिकारी प्रतिमा पुदलवाड व तहसिलदार अजय पाटणे पोलीस टिमसह स्वतः शाेध कार्यात असल्याचे पाठक यांनी पूढे सांगीतले.
दरम्यान गुरुवारी सकाळी आठ वाजल्या पासून पेण येथे १२० मिमी पावसाची नोंद झाली असून अद्याप पावसाचा जोर कायम असल्याने शाेध कार्यात अडचणी येत आहेत.