अलिबाग : शासनाचे बियाणे पुरवठा करणाºया महाबीजकडून यंदाच्या खरीप हंगामाकरिता सुवर्णा आणि जया जातीच्या भात बियाण्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हा पुरवठा अपुºया प्रमाणात झाल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बियाणे वेळेत मिळत नसल्याने यंदा पेरण्यांना विलंब होऊन त्याचा परिणाम संपूर्ण खरीप भात उत्पादनावर होण्याची चिन्हे निर्माण झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होणार असून, यासाठी विविध वाणाचे १८ हजार ५०० क्विंटल भात बियाणांची मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. यातील ६५ टक्के बियाणे महाबीज व कृषिविद्यापीठाकडून उपलब्ध केले जाते.शेतकºयांकडून सुवर्णा व जया या महाबीजच्या बियाण्यांना सर्वाधिक मागणी असते. मात्र, यावर्षी या दोन्ही वाणांची उपलब्धता कमी झाल्याने पुरवठा कमी होत असल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सांगितले. शेतकºयांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ आणि महाबीजच्या तज्ज्ञमंडळींचे मार्गदर्शन घेतले जात आहे. मागणी नोंदविल्याप्रमाणे अपेक्षित बियाण्यांचा साठा न आल्याने ही टंचाई भासत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील शेतकºयांची रोहिणी नक्षत्रातील भातपेरणीची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात पडणाºया पावसाच्या प्रमणावरूनसाधरणपणे १४० ते १४५ दिवसांत तयार होणाºया सुवर्णा व जया या गरव्या वाणांचा वापर येथील शेतकरी करीत असतात. यावर्षी पुरेशा प्रमाणात हे वाण मिळत नसल्याने शेतकºयांना नाईलाजास्तव कर्जत-२, कर्जत-३ आणि पनवेल या जातीच्या वाणांची निवड पेरणीसाठी करावी लागत असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.उत्तर विदर्भातील अनियमित पावसामुळे बियाण्यांचा तुटवडायंदाच्या खरीप हंगामाकरिता मागील वर्षीच्या हंगामात बियाणे तयार करण्यात येत. महाबीज उत्तर विदर्भातून सुवर्णा आणि जया जातीच्या भाताचे बियाणे घेते. मात्र, गतवर्षी उत्तर विदर्भात झालेल्या अनियमित पावसामुळे अपेक्षित प्रमाणात भात बियाणे निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे हा बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला. मात्र, आता पर्यायी कर्जत-०९, श्रीराम, एसएमपी आणि कर्जत-०२ भात बियाणे शेतकºयांना उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक नासीर इनामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, पेरणीच्या तोंडावर भात बियाण्यांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 2:21 AM