सुधागड कुपोषित बालकांच्या संख्येत दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:02 AM2018-03-22T03:02:40+5:302018-03-22T03:02:40+5:30
सुधागड तालुक्यात काही दिवसांपूर्वी कुपोषित बालके आढळली आहेत. नुकतीच पाली तहसील कार्यालयातील हिरकणी कक्षात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत या संदर्भात गंभीर दखल घेण्यात आली. समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश मपारा व अन्य सदस्यांनी कुपोषणाच्या मुद्यावर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
पाली : सुधागड तालुक्यात काही दिवसांपूर्वी कुपोषित बालके आढळली आहेत. नुकतीच पाली तहसील कार्यालयातील हिरकणी कक्षात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत या संदर्भात गंभीर दखल घेण्यात आली. समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश मपारा व अन्य सदस्यांनी कुपोषणाच्या मुद्यावर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. मुंबईतील डॉक्टर फॉर यू या संस्थेने सुधागड तालुक्यात नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ३२ मुले कुपोषित आढळल्याचा अहवाल दिला आहे. रायगड जिल्ह्यात कर्जतपाठोपाठ सुधागड तालुक्याचा कुपोषित बालकांच्या संख्येत दुसरा क्र मांक लागतो असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी एस.एस. कवितके यांनी कुपोषित बालकांची योग्यरीत्या तपासणी व त्यांना नियमित पोषक आहार पुरविला जात असून कुपोषित बालकांचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती दिली.
यावेळी पोषण आहार या विषयावर सभापती साक्षी दिघे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत घरकूल योजनेत झालेल्या अनागोंदी कारभारावर देखील गदारोळ झाला. परशुराम कदम (रा.पुई) यांच्या नावे आलेल्या घरकुलाच्या निधीची रक्कम अन्य खातेदाराच्या खात्यात जमा होवून मूळ लाभार्थी वंचित राहिला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अशा प्रकारे घरकूल निधीपासून आजही अनेक लाभार्थी वंचित असल्याने त्यांना लवकर निधी मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. वारंवार खंडित होणाºया बीएसएनएल दूरध्वनी व इंटरनेट सेवेबद्दल नागरिकांनी तक्र ार केली. तसेच बीएसएनएलच्या जमिनीखालून जाणाºया आॅप्टिकल फायबर केबल केवळ दोन ते अडीच फुटाखालून टाकल्या जात आहेत. त्या केबल पाच फूट जमिनीखालून टाकण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. सुधागड तालुक्यासाठी बीएसएनएलचा प्रभारी अधिकारी असून कामकाज सुरळीतपणे पार पाडून नागरिकांना सातत्यपूर्ण सेवा मिळण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी केली.
या बैठकीस सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष राजेश मपारा, पाली-सुधागड पंचायत समितीच्या सभापती साक्षी दिघे, पाली सुधागड तहसीलदार बी.एन.निंबाळकर, नायब तहसीलदार वैशाली काकडे आदिंसह जांभुळपाडा सरपंच गणेश कानडे, लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा लता कळंबे, रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, राजेंद्र गांधी तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
‘त्या’ महिलेचा
मृत्यू नैसर्गिक
यावेळी सुधागड तालुक्यात काही महिनाभरापूर्वी झालेल्या वृध्द महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विषय चर्चेत आला असता पोलीस उपनिरीक्षक एन.डी.चव्हाण यांनी यावर खुलासा केला. ते म्हणाले की, या महिलेवर बलात्कार अथवा खून झाला नसून तिचा नैसर्गिक मृत्यू झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
यावेळी लता कळंबे यांनी जांभुळपाडा धोकादायक पुलाच्या दुरु स्तीकामी होत असलेल्या दिरंगाईबाबत प्रश्न उपस्थित केला.
या बैठकीत विविध विभागाशी निगडित विषयांवर विस्तृत चर्चा होवून प्रश्न व समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने या महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि जनतेने योग्य समन्वय साधून काम करून सुधागड तालुक्याचा विकासाचा स्थर उंचावण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे. प्रशासकीय अधिकाºयांनी लोकसेवकांच्या दबावतंत्राखाली काम न करता लोकाभिमुख व पारदर्शक कारभार करण्याच्या दृष्टीने काम करावे.
- राजेश मपारा, अध्यक्ष, सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती