कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील ज्या-ज्या गावांमधून रिलायन्स गॅस पाइप टाकली जात आहे, त्या शेतकऱ्यांवर रिलायन्स कंपनीचे अधिकारी दबाब टाकून दादागिरी करत असल्याने या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी राजकीय पक्षांनी आंदोलने उभारली, परंतु या आंदोलनातून काहीही फायदा झाला नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकºयांवर आता रिलायन्सचे अधिकारी दादागिरी करत आहेत असे असताना तालुक्यातील राजकीय पुढारी गप्प का, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित के ला जात आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी नेरळ परिसरातील सर्व शेतकºयांनी बैठक घेऊन जमिनीचा ठरल्याप्रमाणे योग्य मोबदला न मिळाल्यास आम्ही सर्व शेतकरी आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे.कर्जत तालुक्यातील मानिवली, निकोप, मोहिली, बिरदोले, अवसरे, कोदीवले अशा अनेक गावांमधून रिलायन्स गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु आहे. ज्या शेतकºयांच्या जमिनीतून पाइपलाइन टाकली जाणार आहे अशा शेतकºयांना बजाजी नाईक निंबाळकर या रिलायन्स अधिकाºयांच्या समोर पाच लाख रु पये गुंठा असा भाव ठरला होता, त्याचा मोबदला पाइपलाइन टाकण्याअगोदर तीन टप्प्याने देण्याचे ठरले होते, परंतु ७० टक्के काम झाले असताना अद्याप शेतकºयांना मोबदला देण्यात आला नाही. आता रिलायन्स कंपनीचे अधिकारी शेतकºयांवर दबाव टाकून दादागिरी करण्याचा प्रयत्न करतआहे.येथे शेतकºयांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात नापीक झाल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी आक्र मक झाले असून शेतकºयांनी मोहिली भागात हे काम बंद पाडले आहे, परंतु अधिकारी त्यांच्यावर दादागिरी करत असल्याने शेतकºयांनी पोलिसांत धाव घेऊन न्याय मागण्याची विनंती केली आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या जमिनीमध्ये पाइपलाइन टाकून देणार नाही. जर का या रिलायन्स कंपनीच्या अधिकाºयांनी आम्हा शेतकºयांवर दबाव टाकून दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या शेतात आत्मदहन करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही रिलायन्स कंपनी आणि प्रशासनाची राहील असा इशारा नेरळ परिसरातील शेतकºयांनी दिला आहे.तसेच अखिल भारतीय मानवाधिकार संघटना गप्प बसणार नाही, ही संघटना शेतकºयांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी आहे, शेतकºयांना योग्य मोबदला न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.रिलायन्सचे अधिकारी आणि शेतकºयांची मंगळवारी नेरळ पोलीस ठाण्यात बैठक होणार आहे. यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. रिलायन्सचे बजाजी नाईक निंबाळकर या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. रिलायन्सचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात समोरासमोर चर्चा होईल यानंतर निर्णय होईल.- सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक,नेरळ पोलीस ठाणेरिलायन्स कंपनीने पाच लाख रु पये गुंठाप्रमाणे शेतीची भरपाई देण्याचे मान्य केले होते, परंतु अद्याप शेतीची भरपाई मिळाली नाही, शेतीचे नुकसान झाले असून शेती पूर्णपणे नापीक झाली आहे. मला कोणाचाही आधार नसल्याने माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही.- अंजना दुर्गे, महिला शेतकरीनुकसानग्रस्त शेतकरी संतप्तनिसर्गही साथ देत नसल्याने शेतकरी हतबल आहे, अशा अनेक कारणांमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. हे कमी क ी काय म्हणून रिलायन्ससारख्या कं पन्या स्वत:च्या हितासाठी शेतकºयांवर अन्याय करत आहे. त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला ७० टक्के काम होऊनहीमिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.कर्जत तालुक्यातील मानिवली, निकोप, मोहिली, बिरदोले, अवसरे, कोदीवले अशा अनेक गावांमधून रिलायन्स गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी या ठिकाणच्या शेतकºयांच्या जमिनी कं पनीने घेतल्या आहेत.रिलायन्स कंपनीने आम्हा सर्व शेतकºयांची फसवणूक केल्याने आम्ही पाइपलाइन टाकण्याचे काम बंद केले आहे. रिलायन्स कंपनीने पाच लाख रु पये गुंठाप्रमाणे मोबदला देण्याचे कबूल केले होते. ती रक्कम चेक स्वरु पात देण्याचे ठरले होते. आणि पाइपलाइन टाकण्याच्या अगोदर ही रक्कम देण्याचे ठरले असताना ही रक्कम देण्यात आली नसल्याने हे काम आम्ही बंद केले आहे, त्यामुळे रिलायन्स कंपनीचे अधिकारी आमच्यावर दादागिरी करत आहे.- आत्माराम झांजे, शेतकरी, निकोपजोपर्यंत आम्हाला आमच्या शेतीचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करू देणार नाही, कंपनीच्या अधिकाºयांनी जर दादागिरी करून काम सुरू केले तर आम्ही येथे आत्मदहन करू, याची सर्वस्वी जबाबदारी रिलायन्स कंपनी आणि शासनाची राहील.- महेश म्हसे, शेतकरी मोहिली -निकोपशेतकºयांच्या शेतीचे नुकसान झाले असताना कंपनीचे अधिकारी शेतकºयांवर दादागिरी करत असताना तालुक्यातील राजकीय पुढारी मात्र गप्प आहेत. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अन्यथा शेतकºयांवर अन्याय होत असताना अखिल भारतीय मानवाधिकार संघटना गप्प बसणार नाही, ही संघटना शेतकºयांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी आहे, शेतकºयांना योग्य मोबदला न मिळाल्यास शेतकºयांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल .- गोरख शेप, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मानवाधिकार संघटना
शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 6:42 AM