अलिबाग : सुनील तटकरे हे रोज पक्ष बदलत असतात. आमचा पक्ष हा इंडिया आघाडीत सामील असून आगामी ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक ह्या आघाडीतून लढवणार आहे. शेकाप हा लोकसभेला इच्छुक नाही. जो उमेदवार इंडिया आघाडी देईल त्याचे काम आम्ही करणार आहोत. शिवसेना आमदार बाबत सुरू असलेल्या सुनावणी बाबत जाणून बुजून उशिरा केला जात आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत गांभीर्याने प्रकरण घेईल. आठ दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होईल असे मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आर डी सी सी बँकेंवर सहाव्यांदा चेअरमन पदी विराजमान झाल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आगामी निवडणुकीत शेकापची भूमिका काय, पक्षांतर्गत सुनावणी आणि राजकीय परिस्थिती बाबत प्रश्न उपस्थित केला असता आमदार जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.
रायगडाचे खासदार सुनील तटकरे यांच्या विजयात शेकापचा खारीचा वाटा आहे. मात्र सध्या तटकरे हे अजित पवार गटात आहेत. याबाबत आमदार पाटील यांना प्रश्न विचारला असतात. सुनील तटकरे हे रोज पक्ष बदलत आहेत. तटकरे हे कुठल्या राष्ट्रवादीत आहेत. कधी आहेत म्हणतात कधी शरद पवार यांना भेटायला जातात. सध्या गोंधळ सुरू आहे. जसे तुम्ही गोंधळाला आहात तसा मी ही गोंधळलेलो आहे. कोण कुठे आहे कोण कुठे नाही हे कळत नाही. सकाळी उठलो की वेगळीच बातमी येते. पुन्हा हे शरद पवार यांच्याकडे येणार नाही. पक्ष बदल्या विरोधात जनतेची तीव्र नाराजी आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शेकाप हा इंडिया आघाडी मध्ये आहे. प्रागतिक पक्षाचा प्रमुख म्हणून मी इंडिया आघाडी बैठकीत होतो. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी आम्हाला त्याग करावा लागला तरी चालेल. इंडिया च्या माध्यमातून सर्व निवडणुका आम्ही एकत्रित लढवणार आहोत. शेकाप हा लोकसभेसाठी इच्छुक नाही. जो उमेदवार आघाडी देईल त्याचे काम करणार आहोत असे स्पष्टीकरण आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.
शिवसेना आमदार फुटी बाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी सुरू आहे. मात्र यामध्ये जाणूनबुजून उशीर केला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालय यामध्ये पुढाकार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठ दिवसात चित्र स्पष्ट होईल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.