शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दासगाव अंगणवाडीत निकृष्ट तांदळाचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:26 AM

महाड तालुक्यात दासगाव येथील अंगणवाडीत गेल्या महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या तांदळापैकी ५० किलोच्या एका बॅगेत अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदूळ होता.

- सिकंदर अनवारेदासगाव - महाड तालुक्यात दासगाव येथील अंगणवाडीत गेल्या महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या तांदळापैकी ५० किलोच्या एका बॅगेत अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदूळ होता. अंगणवाडी सेविकेने हा प्रकार वरिष्ठ कार्यालयाला कळवला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी अंगणवाडी सेविकेलाच दमात घेत तांदूळ बदलून दिला. यामुळे निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला एकात्मिक बाल विकासच पाठबळ देतेय का, असा संशय व्यक्त होत आहे.महिला बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालणाºया अंगणवाड्यांना सकस आहार दिला जातो. प्रत्यक्षात हा सकस आहार बालकांच्या आरोग्यास पोषक आहे का घातक असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेवर पुरवठा न होणे, निकृष्ठ दर्जाचा पुरवठा असे अनेक प्रकार वारंवार दिसून येतात. वरिष्ठ पातळीवर तक्र ारी होवून देखील कारवाई होत नसल्याने हे प्रकार सुरूच राहत आहेत.महाड तालुक्यातील दासगाव मोहल्ला अंगणवाडीवर गेल्या महिन्यात २८ आॅगस्ट रोजी पुरवठा करण्यात आलेल्या एकूण तांदळापैकी ५० किलोच्या एका बॅगमध्ये उंदराच्या लेंड्या आणि कचरा तसेच निकृष्ट दर्जाचा तांदूळ आढळला. अंगणवाडी सेविकेने याबाबत निरीक्षक अधिकाºयांना कळवले, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. माध्यमांना या प्रकाराबाबत माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाºयांचे धाबे दणाणले. एक आठवड्यानंतर महाड एकात्मिक बाल विकासच्या अधिकारी बने आणि फड यांनी अंगणवाडीवर धाव घेवून पाहणी केली. यामध्ये पन्नास किलोच्या एकाच पिशवीत खराब तांदूळ आढळून आला. याबाबत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी अधिकारी वर्गाने तत्काळ तांदूळ बदलून दिला. खराब तांदूळ ठेकेदाराने परस्पर उचलला, मात्र पालकांनी पुन्हा तक्र ार केल्यानंतर तांदूळ महिला बाल कल्याण विभागाने मागवून घेतला.जिल्हा एकात्मिक बाल विकास कार्यालयाला दिलेल्या लेखी तक्रारीतही, ठेकेदाराने पुरवठा केलेला तांदूळ चांगला असून फक्त एका बॅगमध्येच खराब तांदूळ आढळल्याचे सांगत ठेकेदाराची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. खराब तांदूळ बदलून दिला असला तरी ठेकेदारावर मात्र कोणतीच कारवाई वरिष्ठ पातळीवर झालेली नाही. स्थानिक प्रशासनाने केवळ पत्रव्यवहार केला आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळणाºया ठेकेदारांवर कोणती कारवाई होतेय याबाबत पालक लक्ष ठेवून आहेत.एकात्मिक बाल विकासची अजब कारवाईदासगाव अंगणवाडीवर हा तांदूळ आढळून आल्यानंतर पालकांनी याबाबत तक्र ार केली, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. तांदूळ बदलून देण्याऐवजी साफ करून वापरण्याचा सल्ला अंगणवाडी सेविकेला देण्यात आला. मात्र संबंधित अंगणवाडी सेविकेने हा तांदूळ वापरला नाही.प्रसिद्धी माध्यमाकडे तक्र ार केल्याचे समजताच एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकेलाच दमात घेतले. ज्या ठेकेदाराने हा तांदूळ पुरवठा केला होता त्या ठेकेदारावर कारवाई न करताच उलट त्याचे काम अधिकारी वर्गाने करत अंगणवाडीवर जावून तांदूळ बदलून देण्याचे काम केले.पोषण आहाराबाबत अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दासगाव अंगणवाडीवर प्रत्यक्ष भेट देवून तांदूळ बदलून दिला आहे. शिवाय सदर ठेकेदाराकडून चांगल्या प्रकारे पुरवठा व्हावा याबाबत कळवण्यात आले आहे.- राजेश्री बने, प्रकल्प अधिकारी, महाड

टॅग्स :Raigadरायगड