नेरळ : कर्जत तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातपडताळणी दाखला अनिवार्य केला आहे. मात्र पावसाळी परिस्थिती लक्षात घेता शासनाने राज्य निवडणूक आयोगाला सूचना करून जात पडताळणीची अट शिथिल करण्याची मागणी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली जात आहे.रायगड जिल्ह्यात आणि कर्जत तालुक्यात ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक ३१ आॅगस्ट रोजी होत आहे. त्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाºया उमेदवार यांच्यासाठी जात पडताळणी आवश्यक केली आहे. त्यामुळे आरक्षित जागांवर निवडणूक लढवणाºया उमेदवारांना आपली उमेदवारी रद्द होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने २८ जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यावेळी जात पडताळणी बाबत आपला निर्णय जाहीर केला नव्हता. ९ आॅगस्टपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार होती.त्याआधी म्हणजे ७ आॅगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने जात पडताळणी बद्दल निर्णय घेतला आहे. अशी अधिसूचना काढली असून आरक्षित जागेवर ग्रामपंचायत निवडणूक लढविणाºया उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. पूर्वी आरक्षित जागेवर निवडणूक लढविताना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जे अर्ज केला आहे. त्याची नोंदणी प्रत देखील पुरेशी होती. मात्र ७ आॅगस्ट रोजी घेतलेल्या निर्णयाने आरक्षित जागेवर ग्रामपंचायत निवडणूक लढविणाºया सर्व उमेदवारांना धडकी भरली आहे. त्यामुळे कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून ग्रामपंचायत निवडणुकसाठी करण्यात आलेली जात पडताळणी प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. पत्राची प्रत आमदार सुरेश लाड यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे दिली आहे.इच्छुक उमेदवारांची दमछाकसततच्या पावसाळी स्थिती आणि महापुराची परिस्थिती यामुळे जातपडताळणी प्रमाणपत्र मिळविताना सर्व इच्छुक उमेदवारांची दमछाक होत आहे.त्याचवेळी यांच्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना करावा लागणारा प्रवास हा रस्ते आणि रेल्वे वाहतूक यावर पावसाने केलेला परिणाम यामुळे त्रासदायक होऊन बसले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने घातलेली जात पडताळणी अट रद्द करावी अशी मागणी आमदार सुरेश लाड यांनी केली आहे.
जात पडताळणीची अट शिथिल करण्याची मागणी, सुरेश लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 1:42 AM