पनवेलमध्ये स्वाईन फ्लूची साथ

By admin | Published: August 15, 2015 10:50 PM2015-08-15T22:50:24+5:302015-08-15T22:50:24+5:30

पनवेल शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांतच स्वाईन फ्लूची साथ नियंत्रणात आली असल्याचे वाटत असताना पुन्हा एकदा साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.

Swine Flu with Panvel | पनवेलमध्ये स्वाईन फ्लूची साथ

पनवेलमध्ये स्वाईन फ्लूची साथ

Next

पनवेल : पनवेल शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांतच स्वाईन फ्लूची साथ नियंत्रणात आली असल्याचे वाटत असताना पुन्हा एकदा साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. मागील दहा दिवसांत पनवेलमध्ये सहा रु ग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सहा रु ग्णांपैकी चार रु ग्णांवर पनवेलमधील विविध रु ग्णालयांत उपचार सुरू असून यापैकी दोन रु ग्णांवर मुंबईतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ग्रामीण रु ग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमल तांबडे, जयदीप सहस्रबुद्धे, उषा पेशिवार , नितीन म्हात्रे, प्रतीक्षा ठक्कर यांना आणि महाडमधील अमोल नावाच्या रु ग्णाला एच१एन१ चा संसर्ग झाला आहे. एक ते दोन महिन्यांपूर्वी पनवेलमध्ये एच१एन१ चे २० पेक्षा जास्त रु ग्ण पनवेलमध्ये आढळले होते. यामध्ये कामोठेमधील महिलेचा मृत्यू देखील झाला होता.
हवामानाच्या सततच्या बदलामुळे पुन्हा एकदा स्वाईन फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पनवेल शहरात नगरपरिषदेमार्फत आरोग्य सेवा पुरविली जाते. तसेच ग्रामीण रु ग्णालयातून देखील शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेलमध्ये सिडकोमार्फत विविध सेवा पुरविल्या जातात. मात्र आरोग्य सेवेबाबत सिडको काही ठिकाणी कमी पडत असून सिडकोने या वसाहतीमध्ये रु ग्णालय सुरू केल्यास वसाहतीमधील नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पनवेलमध्ये सहा रु ग्ण एच१एन१ चे बाधित असल्याचे चाचणीत उघड झाले आहे. नागरिकांनी या साथीच्या आजाराची लागण न होण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. तसेच घशात खवखव होणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला येणे, नाकातून पाणी गळती ही या आजाराची लक्षणे आहेत. कोणत्याही व्यक्तीला ही लक्षणे जाणवल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी.
- बी. एस. लोहारे,
वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, पनवेल.

Web Title: Swine Flu with Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.