VIDEO : नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा! इंडियन क्रिकेटर रोहित शर्माचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 08:43 PM2021-12-22T20:43:09+5:302021-12-22T20:43:48+5:30
कोरोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण जग त्रासलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांसाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय आहे.
रायगड - नागरिकांनो लस घ्या अन् कोरोनाला पळवा, असे आवाहन प्रसिध्द क्रिकेटपटू रोहित शर्माने केले आहे. रोहित शर्मा आज खाजगी कामानिमित्त अलिबाग येथे आला होता. यावेळी त्याने रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
यावेळी अलिबाग तहसिलदार मीनल दळवी, सारळ मंडळ अधिकारी पी.बी मोकल यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते.
कोरोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण जग त्रासलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांसाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. त्यादृष्टीने सध्या सर्वत्र प्रशासनातर्फे लसीकरणावर जोर दिला जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा प्रशासनाकडून सर्व पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा! इंडियन क्रिकेटर रोहित शर्माचं आवाहन#RohitSharma #CoronaVaccinepic.twitter.com/vfou4mX1RJ
— Lokmat (@lokmat) December 22, 2021
जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. यात प्रामुख्याने विविध सुप्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री यांच्या व्हिडीओ चित्रफित माध्यमाचा वापर करून नागरिकांना लसीकरणाबाबतचे महत्व सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लस घेण्याबाबत आवाहनही केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रिकेटपटू रोहित शर्मा याने अलिबाग येथे भेट दिली असता त्याने रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घेण्याबाबतचे आवाहन करणारा रोहित शर्माचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.