तळोजा स्फोटप्रकरणी अखेर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 04:32 AM2018-11-02T04:32:49+5:302018-11-02T04:33:14+5:30
आॅपरेशन मॅनेजर कमल किशोर व ज्यांच्या देखरेखीत रसायनांचे विघटन केले जाते त्या विश्वकांत मिश्रा यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल : रामके कंपनीत सोमवारी झालेल्या स्फोटाप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. आॅपरेशन मॅनेजर कमल किशोर व ज्यांच्या देखरेखीत रसायनांचे विघटन केले जाते त्या विश्वकांत मिश्रा यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे म्हणाले. स्फोटात गंभीर जखमी झालेल्या पॉकलेन चालक संतोष पाटीलची प्रकृती स्थिर असून त्याने कंपनीविरोधात तक्रार करण्यास नकार दिला आहे. कंपनीतील २0 रसायनांचे नमुने कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहेत.
ज्या ग्रामस्थांचे या घटनेत मोठे नुकसान झाले आहे त्यांनी पोलीसांत तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. सोमवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित कंपनी बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, चार दिवसांनंतर विरोध मावळल्याचे दिसून आले.