शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळला; तीन ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 6:46 AM

पाथरी खिंडीतील दुर्घटना : ६१ जण जखमी 

लोकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : तालुक्यातील कुडपण गावाजवळ पाथरी खिंडीमध्ये एका वळणावर लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पाे सुमारे १५० फूट दरीत कोसळला. या भीषण अपघातामध्ये दाेघांचा मृत्यू झाला आहे, तर ६१ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लग्नसोहळा उरकून वरपक्ष नववधूला साताऱ्याहून खेड येथे घेऊन येत असताना हा अपघात घडला.

अपघातातील जखमींना महाड, पाेलादपूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. सातारा जिल्ह्यातील कुमटे-काेंडाेशी येथून लग्नकार्य आटपून वऱ्हाड रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-खवटी येथे परतत हाेते. पात्री खिंडीतून परतत असताना एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता आहे. विठ्ठल बक्कु झोरे (६५, रा. खवटी ता. खेड), तुकाराम दत्तू झोरे (४०,रा. कावले, कुंभारडे ता. महाड), भावेश हरिश्चंद्र होगाडे (२३, रा. तुळशी धनगर वाडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

घटनास्थळी पाेलादपूर पोलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक प्रशांत जाधव, डीवायएसपी तांबे पोहोचले आहेत. महाड व खेड तसेच महाबळेश्वर येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. महाड आणि पाेलादपूरमधील खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स पाेलादपूर ग्रामीण रुग्णालयमध्ये हजर झाले आहेत. जखमींवर ताबडतोब उपचार सुरू आहेत, मात्र अपघात एवढा भीषण आहे की जखमींची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. 

जखमींची नावे (वय आणि रहाणार)

१. रामचंद्र बाळू कुटेकर (वय २०, काेतवाल)२. उषा तुकाराम कुटेकर (वय २३, काेतवाल)३. सुमित तुकाराम गवळी (वय २७ , काेतवाल)४. रामचंद्र बाळू गवळी (वय ६२, खवटी)५. शाम बाळु गवळी (वय ६६ खवटी)६. प्रकाश जानू झाेरे ( वय ४९, खवटी)७. कमलाबाई पांडुरंग खुटेकर ( वय ४० , काेतवाल)८. बायाबाई लक्ष्मण कुटेकर (वय ४०, परसुले)९. दत्ताराम जानू झाेरे (वय ४५, खवटी)१०. प्रकाश लक्ष्मण झाेरे ( वय ४०, खवटी)११. आनंद भागाेजी आखाडे ( वय ४४ खवटी)१२. प्रदीप पांडुरंग झाेरे ( वय ४५, कुंभारडी-महाड)१३. विनायक दामू झाेरे (वय ७०, खवटी)१४. संगिता अशाेक झाेरे ( वय ३२, कुंंभारडी)१५. जानू केशव माेरे (वय ५२ )१६. सुभाष बबन माने (वय २०, गवळीवाडी खवटी)१७. अर्जुन लक्ष्मण झाेरे (वय १४ , खवटी)१८. गिता गाेपाळ खुटेकर (वय २६, काेतवाल)१९. रामचंद्र भामरु ढेवे (वय ५८ खवटी)२०. गंगाराम लक्ष्मण झाेरे (वय ८०, खवटी)२१. संताेष दामु झाेरे (वय ४५, कशेडी)२२. विठ्ठल धाेंडु खुटेकर ( वय ६३, काेतवाल)२३. रमेश नितीन खुटेकर (वय १७, काेतवाल)२४. बाबु नामदेव माने (खवटी)२५. रमेश गंगाराम झाेरे ( काेतवाल)२६. बारकु बाळु झाेरे (वय ६०, काेतवाल)२७. यशवंत चंद्रकांत खुटेकर (वय ७०, काेतवाल )२८. सुनील बाबा गाेरे२९. सुनील यशवंत झाेरे (खवटी)३०. उज्वला राजेश ढेवे (वय ३०, खवटी)३१. गंगाराम बाबू झाेरे ( खवटी)३२. महंमद युनुस जाेगीलकर (शिरशवने-विन्हेरे)३३. लक्ष्मण बाबु केंढे ( खवटी)३४. समीर संजय झाेरे ( वय १२, खवटी)३५. कविता संताेष झाेरे ( वय १४ खवटी)३६. कांता प्रकाश झाेरे (खवटी)३७. तेजस लक्ष्मण खुटेकर (परसुले)३८. सुरेश किसन मिस्त्री (कशेडी)३९. रहीम इब्राहीम मुंडेकर (शिररसवने,विन्हेरे)४०. सलमान करीम मुंडेकर (शिरसवनेस विन्हेरे)४१. विवेक विजय गावडे (वनवसी)४२. पेश दिपक पवार  (ताम्हाणे)४३. बाबु यशवंत ढेबे  ( वय २३, खवटी)४४. संताेष अनंत आखाडे (वय २३, खवटी)४५. तुकाराम बाबु पवार (वय ८२ खवटी)

अन्य दाेन जखमींची नावे समजू शकली नाहीत.नातेवाइकांची रुग्णालयांत गर्दीरुग्णालयांमध्ये माेठ्या संख्येने जखमींना आणण्यात आल्याने जखमींच्या नातेवाइकांनीही रुग्णालयांत धाव घेतली आहे. रुग्णालयामध्ये सर्वत्र रडण्या-विव्हळण्याचा आवाज येत असल्याने अंगावर काटा उभा राहत आहे. सातत्याने रुग्णवाहिकांच्या सायरनच्या आवाजाने परिसरात गंभीर वातावरण निर्माण झाले होते. पाेलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई, खेड तहसीलदार प्राजक्ता घाेरपडे, रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे हे घटनास्थळी पाेहोचले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात