रसायनाने भरलेला टँकर पलटी
By admin | Published: July 10, 2015 12:19 AM2015-07-10T00:19:57+5:302015-07-10T00:19:57+5:30
मुंबई - गोवा महामार्गावर दासगावजवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. यामुळे टँकरमधील रसायन रस्त्यावर सांडून
दासगाव : मुंबई - गोवा महामार्गावर दासगावजवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. यामुळे टँकरमधील रसायन रस्त्यावर सांडून शेजारील घरांकडे वाहत गेल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. महाड औद्योगिक वसाहतीमधील स्पॅम टीम तसेच रसायन क्षेत्राशी निगडित कंपन्यांचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी आले. त्यानंतर ही रसायनगळती आटोक्यात आणली.
दासगाव गावाजवळ अवघड वळणावर रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. या अपघातात टँकरचालक सुरेशकुमार लालजी यादव हा जखमी झाला आहे. रत्नागिरी औद्योगिक वसाहतीमधून निघालेला हा टँकर गुजरातकडे जात असताना हा अपघात झाला. टँकर पलटी होताच त्यातून रसायनाची गळती सुरू झाली. यावेळी पोलिसांनी तत्काळ महाड औद्योगिक वसाहतीमधील स्पॅम टीमला बोलावले. त्यांनी रसायनगळती नियंत्रणात आणली. गळती झालेले रसायन हे लूब आॅइल होते. यामुळे ग्रामस्थांना काही काळ खोकला तसेच डोके जड होणे, मळमळणे असे त्रास जाणवले. (वार्ताहर)