तोंडसुरे मोरीचा भाग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:44 AM2017-07-31T00:44:54+5:302017-07-31T00:44:54+5:30
दिघी पोर्टच्या बेकायदा अवजड वाहतुकीमुळे म्हसळा-दिघी राज्यमार्गावर असणाºया मोरीचा खालचा भाग कोसळला. या मोरीकडे लक्ष न दिल्यास एखादा मोठा
म्हसळा : दिघी पोर्टच्या बेकायदा अवजड वाहतुकीमुळे म्हसळा-दिघी राज्यमार्गावर असणाºया मोरीचा खालचा भाग कोसळला. या मोरीकडे लक्ष न दिल्यास एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता तोंडसुरे ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. दिघी पोर्ट विकासाचे माध्यम की भकासाचे हे नागरिकांना समजण्याआधीच दिघी पोर्टमुळे म्हसळासहित आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दिघी पोर्टमधून होणाºया बेकायदा अवजड वाहतुकीमुळे राज्यमार्गावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असतानाच म्हसळा तालुक्यातील मौजे तोंडसुरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाºया तसेच राज्यमार्गाच्या मध्यभागी असणाºया मोरीला खालून भगदाड पडले आहे. म्हसळा-दिघी मार्गावरून दिघी पोर्टमधून तीनशे ट्रेलर बेकायदा दिवसअखेरीस जातात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा या ट्रेलरचे वजन चौपट प्रमाणात असतानाही या गाड्यांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होताना दिसत नाही. परिणामी श्रीवर्धन- म्हसळा- माणगाव तालुक्यातील अनेक छोटे-मोठे पूल, छोट्या मोºयांची दुरवस्था झाली
आहे.
तोंडसुरे येथील ही मोरी शासनाच्या हलगर्जीमुळे शेवटची घटका मोजत असून मोरी तुटल्यास अपघाताची शक्यता आहे. तसेच म्हसळा-बोर्ली मार्ग बंद होऊन अनेक गावांचा म्हसळा शहरासोबत संपर्क तुटणार आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांची शहरात असणारी शाळा बंद होणार, या मार्गावर तब्बल सव्वाशे ते दीडशे मिनीडोर चालत असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न देखील ऐरणीवर येणार आहे. असे असताना शासन दिघी पोर्टचे की सामान्य जनतेचे, असा प्रश्न परिसरातील संतप्त नागरिकांकडून सरकार आणि प्रशासनाला विचारला जात आहे.