यंदा पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:30 AM2017-09-15T06:30:24+5:302017-09-15T06:30:46+5:30

रायगड जिल्ह्यात फलोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वाव असून, यावर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यातील शेतक-यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवून फळबाग क्षेत्र वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कृषी विभागास दिले आहेत.

 Target for Horticulture Seed on 5000 hectare area this year | यंदा पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट

यंदा पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट

Next

विशेष प्रतिनिधी 
अलिबाग : रायगड जिल्ह्यात फलोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वाव असून, यावर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यातील शेतक-यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवून फळबाग क्षेत्र वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कृषी विभागास दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील कृषी, आत्मा व कृषी संलग्न विभागांच्या कामाचा आढावा घेऊन जिल्ह्यात राबविण्यात येणाºया योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया फलोत्पादन अभियान व फळबाग लागवड योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात गटशेतीसाठी एक कोटी रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य देण्याची व गटशेतीस प्रोत्साहन व चालना देण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली असल्याचे नमूद करून त्यानुसार यंदा जिल्ह्यात सेंद्रिय भात, सेंद्रिय भाजीपाला, निर्यातक्षम आंबा व प्रक्रिया याबाबत गटशेतीचे प्रस्ताव प्रत्येक तालुक्यातून सादर करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, कृषी क्षेत्रातील योगदान असलेले शेतकरी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, रोहयो उपजिल्हाधिकारी पी. एस. जैतू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग सिगेदार, आत्मा प्रकल्प संचालक मंगेश डावरे, तसेच कृषी, आत्मा, वनविभाग, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, दुग्धविकास व जलसंधारण विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, प्रगतशील शेतकरी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादन कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कडधान्य पिकाचे क्षेत्र दुप्पट करण्याचे आवाहन
आत्माअंतर्गत विविध योजना, जलयुक्त शिवार व पाणलोट विकास कार्यक्र म, पीकविमा योजना याबाबतही या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढविण्यासाठी भातपीक निघाल्यावर जमीन अंगओलितावर किंवा सिंचन सुविधा उपलब्ध असतील तेथे रब्बी हंगामात कडधान्य पिकाचे क्षेत्र दुप्पट करण्याचे आवाहन करण्यात आले. जलयुक्त शिवार व ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या दोनही राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी धोरणांवर भर देऊन नियोजन करण्याची सूचना त्यांनी अखेरीस अधिकाºयांना केली.

Web Title:  Target for Horticulture Seed on 5000 hectare area this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी