चवदार तळ्यातील पाणी होणार चवदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 02:50 AM2018-04-13T02:50:12+5:302018-04-13T02:50:12+5:30

चवदार तळ्यातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी शासन एक कोटी ३७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत केली.

Tasty water will be tasty in the lake | चवदार तळ्यातील पाणी होणार चवदार

चवदार तळ्यातील पाणी होणार चवदार

Next

महाड : चवदार तळ्यातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी शासन एक कोटी ३७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत केली. यामुळे महाड नगरपरिषदेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
बुधवारी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात बैठक बोलावली होती. त्या बैठकीत त्यांनी ही घोषण केली. या बैठकीस भदन्त राहुल बोधी, आ. प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. पंडित पाटील, आ. प्रवीण दरेकर, माजी आमदार माणिकराव जगताप, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्यासह आंबेडकरी संघटनांचे नेते, तसेच शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
एम.जी.पी.ने तयार केलेला हा जलशुद्धीकरण आराखडा एक कोटी ३७ लाख रु पयांचा असून, त्यामध्ये चवदार तळ्यातील गाळ काढून अल्ट्रा व्हायलेट सिस्टीमद्वारे पाणी शुद्ध करणे, तळ्यात मध्ये मध्ये एरियारेटर बसविणे, गटार लाइन बांधणे, जे भीमसैनिक लांबून येतात, ते तळ्याचे पाणी आपल्यासोबत घेऊन जातात, त्यांच्यासाठी स्टँडपोस्ट (नळ) उभारणे आदी कामे या निधीतून करणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. या वेळी माजी आमदार माणिकराव जगताप यांनी अमृतसर येथील सुवर्णमंदिरासारखे, चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी करीत, शासनाने हा जलशुद्धीकरणाचा निधी त्वरित द्यावा, अशी मागणी केली. आ. भरत गोगावले यांनीही हा जलशुद्धीकरण कामाचा निधी शासनाने लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी केली.

Web Title: Tasty water will be tasty in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.