शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

जाळ्यात अडकून कासवांचा मृत्यू ; कासव संरक्षक व संवर्धकांत चिंतेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 3:50 AM

मोठ्या मच्छीमार बोटींच्या मासे पकडण्याच्या नायलॉनच्या जाळ््यात अडकून आणि बोटींच्या पंख्यांत (इम्पेलर) जखमी होऊन दुर्मीळ प्रजातीची ‘आॅलिव्ह रिडले’ कासवांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कासव संरक्षण व संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय असणाऱ्या पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

- जयंत धुळपअलिबाग : मोठ्या मच्छीमार बोटींच्या मासे पकडण्याच्या नायलॉनच्या जाळ््यात अडकून आणि बोटींच्या पंख्यांत (इम्पेलर) जखमी होऊन दुर्मीळ प्रजातीची ‘आॅलिव्ह रिडले’ कासवांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कासव संरक्षण व संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय असणाऱ्या पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या २० मार्च रोजी रत्नागिरीतील दापोली तालुक्यात सागरकिनारी पाच, तर अलिबाग जवळच्या वरसोली सागरकिनारी शनिवारी एक ‘आॅलिव्ह रिडले’ कासव मृतावस्थेत आढळले. गतवर्षी दिवेआगर सागरकिनारीही दोन मृत कासवे आढळल्याची माहिती वनखात्याच्या दिवेआगर येथील सागरी कासव संरक्षण व संवर्धन प्रकल्पात कार्यरत निसर्गप्रेमी फॉरेस्ट राउंड आॅफिसर हरिश्चंद्र नाईक यांनी दिली.कासवांच्या पिल्लांचा जन्म ज्या सागरकिनारी होतो, त्याच सागरकिनारी ते मोठे झाल्यावर अंडी घालण्याकरिता येतात, हे या आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे वैशिष्ट्य असल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. वैभव देशमुख सांगतात. आॅलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षण व संवर्धन मोहिमेतून गेल्या १५ ते १६ वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आता त्याच कासवांचे मृत्यू रोखण्याकरिता मच्छीमारांमध्ये जनजागृतीची गरज डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.सागरी कासवे श्वसन प्रक्रियेकरिता समुद्राच्या वरच्या भागात येतात, त्यामुळे बºयाचदा ते मासे पकडण्यासाठी असलेल्या जाळ्यात अडकतात. तर अनेकदा बोटींच्या पंख्याने जखमी होतात. वाळू उत्खननामुळे, बंदर उभारणीमुळे, तेल किंवा घातक रसायने सागरातील अपघात, सागरी कासवांचे जगण्याचे प्रमाण केवळ दहा टक्के असल्याचे देशमुख यांनी अखेरीस सांगितले.नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनात रायगड वनविभागाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात येत आहे. दिवेआगर, वेळास आणि हरिहरेश्वरच्या किनारपट्टीत सागरी कासवांच्या माद्या अंडी घालण्याकरिता येतात. ही अंडी संरक्षित करून जन्माला येणारी पिल्ले पुन्हा सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्याचे काम वनखात्याचे नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी १० ते १२ वनमजूर आणि निसर्ग व पर्यावरणप्रेमी करीत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी २०१७मध्ये ३६७ सागरी कासवांच्या अंड्यांचे दिवेआगर परिसरात संवर्धन करून नवजात पिल्लांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. यंदा दिवेआगर सागरकिनारी दहा घरट्यांचे संरक्षण करण्यात आले असून, पैकी पाच घरट्यांतील ५६१ नवजात पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले आहे.४० हजार कासवांच्या पिल्लांचे संवर्धनसागरीकिनारपट्टीतील ग्रामस्थांमध्ये कासवाचे महत्त्व, सागरी कासव नष्ट झाले तर समुद्राची होणारी हानी याविषयी जनजागृती करण्यात आली. भाऊ काटदरे, जयंत कानडे, विजय महाबळ, राम मोने आदीं पर्यावरणप्रेमींनी १९९२ मध्ये चिपळूणला निसर्ग संवर्धन व संशोधनासाठी ‘सह्याद्री निसर्गमित्र मंडळ’ या संस्थेची स्थापना केली.- कासवांच्या संवर्धनाकरिता त्यांनी किनारीभागात चळवळच उभी केली. गेल्या १६ वर्षांत सुमारे ४० हजार कासवांच्या पिल्लांचे संवर्धन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास, केळशी, अंजर्ला, दाभोळ, कोळथरे, मुरुड तर रायगड जिल्ह्यात दिवेआगर, मारळ, हरिहरेश्वर आदी १५ ते २० ठिकाणी कासव संरक्षण मोहिमेचे तंबू निर्माण करण्यात यश आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड