शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

Tauktae Cyclone: रायगड समुद्रकिनारी दोन दिवसांत आढळले ८ मृतदेह; ओळख पटवण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 8:36 AM

अलिबागमध्ये ७ आणि मुरुडमध्ये १ मृतदेह आढळले आहे.

रायगड: तौक्ते वादळाचा तडाखा मुंबई हाय परिसरात तेल विहिरींसाठी काम करणाऱ्या नौका आणि तराफांना बसून झालेल्या दुर्घटनेनंतर बेपत्ता  कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असताना रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर दोन दिवसात आठ मृतदेह आढळले आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. 

अलिबागमध्ये ७ आणि मुरुडमध्ये १ मृतदेह आढळले आहे. नागरिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर रायगड पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले. या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यांचे डीएनएही घेण्यात येणार असून ओळख पटवण्यासाठी मुंबई पोलीस आणि ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक दुधे यांनी सांगितले.  तसेच गुजरातच्या वलसाडमध्येही ८ मृतदेह आढळले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. 

अलिबाग आणि मुरुडच्या किनाऱ्यावर आढळून आलेले हे मृतदेह तौक्ते चक्रीवादळात मुंबई - हाय जवळ बुडालेल्या बार्जमधील बेपत्ता असलेल्या व्यक्तींचे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर पुढील माहिती जाहीर करण्यात येईल असं तूर्तास रायगड जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 

...तर दुर्घटना टळली असती!

हवामान विभागाकडून धोक्याची सूचना मिळाल्यानंतरही तौक्ते चक्रीवादळ जास्त वेळ राहणार नाही, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, या भ्रमात, कॅप्टन राकेश बल्लवने बार्ज पी-३०५ ला सुरक्षितस्थळी हलविले नाही. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी डिस्ट्रेस सिग्नल दिला नाही, असा आरोप होत आहे.  

१७ तास तरंगत केली मृत्यूवर मात !

ताशी ६० ते ७० नॉट्स वेगाने वाहणारे वारे वाहात असताना १५ ते २० जण एकमेकांचे हात पकडून संध्याकाळी ५ ते सकाळी १० असे सुमारे १७ तास समुद्रात तरंगत होतो. मदतीसाठी आरडाओरड करत हाेताे, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मदतीला कोणी पोहोचले नाही, हा अनुभव अभियंता मुस्ताफिजुर रेहमान शेख यांनी कथन केला.   

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळRaigadरायगडDeathमृत्यूPoliceपोलिस