रायगड : तौक्ते वादळाचा तडाखा मुंबई हाय परिसरात तेल विहिरींसाठी काम करणाऱ्या नौका आणि तराफांना बसून झालेल्या दुर्घटनेनंतर बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असताना रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पाच मृतदेह आढळले आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलीस तसेच ओएनजीच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले.शुक्रवारी सायंकाळी मुरूड समुद्रकिनारी स्थानिक नागरिकांना एक मृतदेह आढळला. लागोपाठ अलिबाग तालुक्यातील मांडवा परिसरात दोन, तर अलिबाग समुद्रकिनारी दोन मृतदेह सापडले. नागरिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर रायगड पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले. या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यांचे डीएनएही घेण्यात येणार असून ओळख पटवण्यासाठी मुंबई पोलीस आणि ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक दुधे यांनी सांगितले.
...तर दुर्घटना टळली असती!मुंबई : हवामान विभागाकडून धोक्याची सूचना मिळाल्यानंतरही तौक्ते चक्रीवादळ जास्त वेळ राहणार नाही, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, या भ्रमात, कॅप्टन राकेश बल्लवने बार्ज पी-३०५ ला सुरक्षितस्थळी हलविले नाही. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी डिस्ट्रेस सिग्नल दिला नाही, असा आरोप होत आहे. १७ तास तरंगत केली मृत्यूवर मात !मुंबई : ताशी ६० ते ७० नॉट्स वेगाने वाहणारे वारे वाहात असताना १५ ते २० जण एकमेकांचे हात पकडून संध्याकाळी ५ ते सकाळी १० असे सुमारे १७ तास समुद्रात तरंगत होतो. मदतीसाठी आरडाओरड करत हाेताे, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मदतीला कोणी पोहोचले नाही, हा अनुभव अभियंता मुस्ताफिजुर रेहमान शेख यांनी कथन केला.