शिक्षक बदली घोटाळ्यातील आरोपीच्या मुसक्या आवळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:52 PM2018-09-07T23:52:41+5:302018-09-07T23:52:50+5:30

रायगड जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना सापडत नव्हता, मात्र कोकण आयुक्तांच्या एका अहवालाद्वारे खऱ्या आरोपीचे पितळ आता उघडे पडले आहे.

The teacher will be the accused in the transfer of the case | शिक्षक बदली घोटाळ्यातील आरोपीच्या मुसक्या आवळणार

शिक्षक बदली घोटाळ्यातील आरोपीच्या मुसक्या आवळणार

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना सापडत नव्हता, मात्र कोकण आयुक्तांच्या एका अहवालाद्वारे खऱ्या आरोपीचे पितळ आता उघडे पडले आहे. त्यामुळे कोकण आयुक्तांच्या अहवालाची प्रत प्राप्त होताच आरोपीविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील अन्य आरोपींचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या खोट्या सह्या आणि बनावट दस्तऐवज तयार केले होते. रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने तक्रार देताना अज्ञात व्यक्तीने घोटाळा केल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनीही अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. जिल्हा परिषद प्रशासनाने याप्रकरणातील सर्व दप्तरच पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र सुमारे आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी पोलिसांना आरोपीपर्यंत पोचता आलेले नाही. एकूणच घडामोडींवर नजर टाकल्यास प्रशासन आणि पोलीस यांची भूमिका आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न तर करणारी नाही ना असा संशय आहे.
रायगड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा बदलीसाठी रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या नावाने बनावट दस्तऐवज तयार करणारा आरोपी हा प्रशासनातीलच अमोल ठाकूर आहे. कोकण विभागाच्या आयुक्तांनी शासनाच्या ग्रामविकास विभागास सादर केलेल्या एका अहवालामध्ये याचे नाव समोर आले आहे.
कोकण आयुक्तांनी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या सचिवांना १८ डिसेंबर २0१७ रोजी जिल्हा परिषदेचे तत्कालीन उप मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या वर्तणुकीबाबत अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक (लिपिक) अमोल ठाकूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खोट्या सह्या करून पंधरा आंतर जिल्हा बदल्या केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे असा उल्लेख आहे. त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश तत्कालीन उप मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देवूनही त्याच्यावर गुन्हा दाखल न करता लिपिकाची पाठराखण केली गेली असल्याचा उल्लेख आहे.

शिक्षण विभागातील लिपिकाच्या खोट्या सह्या
तक्र ार दाखल करणाºया शिक्षण विभागाने तक्र ारच अशी दाखल केली आहे की ती निकाली निघावी. कारण जर बनावट सह्यांचे आदेश सादर करणाºया २१ शिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडे आहे आणि गेली दोन वर्षे चौकशी सुरू आहे तर या शिक्षकांनी त्यांना सीईओंच्या सहीची बनावट पत्रे शिक्षण विभागाकडील कोणत्या व्यक्तीने दिली हे सांगितलेले नाही हे म्हणणेच तकलादू ठरते. शिक्षण विभागातील लिपिकाने खोट्या सह्या केल्याचे आयुक्तांच्या अहवालामध्ये नमूद केलेले आहे. जो अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांच्या १३ डिसेंबर २0१७ रोजी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रावर आधारित आहे तर तत्कालीन शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्र ार का केली असा सवालही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामध्ये मोठे रॅकेट आहे. अमोल ठाकूर हा फक्त मोहरा आहे. त्याचे गुरू वेगळेच असल्याने या प्रकरणाचा पोलिसांनी गांभीर्याने तपास केला पाहिजे. परंतु आठ महिने होवूनही पोलिसांना या प्रकरणात हाती काही लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, शिक्षक बदली घोटाळ्यातील आरोपीविरोधात पुरावा सापडत नव्हता, मात्र कोकण आयुक्तांच्या अहवालात लिपिक अमोल ठाकूरचे नाव उघड झाल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले. अमोल ठाकूरला निलंबित केलेले आहे. अमोल ठाकूर पोलिसांच्या हाताला लागल्यावर या घोटाळ्यातील रॅकेटमध्ये कोणकोण होते याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

बोगस दस्तऐवजाच्या आधारे बदली झालेल्या शिक्षकांची नावे
श्रीकांत चव्हाण, फारूक कमठाणे, मुरलीधर डाके, उमाकांत दिघे, बालाजी तेलावर, मारु ती मॅकले, वृषाली पामे, शिवशंकर लांडगे, नितेश कोरडे, वृषिकेश कुठे, रईसा अमची चुगे, भागवत वतपाव, धनाजी मानसिंगे, अनसूया शिंदे, सुनंदा काकडे, गजानन मोरे, सुरेश भिल, गोदावरी काडेवाड, सचिन ठाकरे व रजिवाना बेगम शेख यासह अन्य एका शिक्षकाचे नाव आहे.

Web Title: The teacher will be the accused in the transfer of the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक