प्राध्यापकांना एक वर्षापासून पगार नाही
By admin | Published: September 8, 2015 12:01 AM2015-09-08T00:01:15+5:302015-09-08T00:01:15+5:30
बी. एल. पाटील तंत्रनिकेतनच्या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षापासून पगारच मिळालेला नाही. एक वर्ष विनावेतन काम करावे लागल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. या कर्मचाऱ्यांनी १० सप्टेंबरपासून
खोपोली : बी. एल. पाटील तंत्रनिकेतनच्या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षापासून पगारच मिळालेला नाही. एक वर्ष विनावेतन काम करावे लागल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. या कर्मचाऱ्यांनी १० सप्टेंबरपासून उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
जुलै २०१४ ला व्यवस्थापनाने जुलै २०१५ ची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पगार देण्याचे आश्वासन तंत्रनिकेतनच्या प्राध्यापकांना दिले होते. मात्र यावर्षीही प्रवेश कमी झाल्याचे कारण देवून, व्यवस्थापन पगार देण्याबाबत टाळाटाळ करीत आहे. प्रवेश कमी झाले त्यात आमचा काय दोष? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांचे विनंती पत्रही घेतले नाही, त्यांना ते पोस्टाने पाठवावे लागले. व्यवस्थापनाने हटवादीपणाची भूमिका सोडून सर्वमान्य तोडगा काढावा, अन्यथा १० सप्टेंबरपासून उपोषणास बसण्याचा इशारा सुजात घोरपडे, एन. एन. जाधव, वैभव कांबळे, सिमंतिनी आपटे, संदीप गायकवाड, शीतल पाटील, शरयू पाटील, आप्पासाहेब रूपनर, वैशाली निकम यांनी एका पत्राव्दारे दिला आहे.
खोपोली तंत्रनिकेतनमध्ये यंदा प्रवेश खूप कमी झाले आहेत. संस्थेवर पाच कोटींचे कर्ज झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये तंत्रनिकेतन चालवणे कठीण झाले आहे.
- दत्तात्रय मसुरकर, अध्यक्ष
खालापूर ता. शिक्षण प्रसारक मंडळ