शिक्षकांनी संघटीत होणे गरजेचे
By admin | Published: January 23, 2017 05:39 AM2017-01-23T05:39:33+5:302017-01-23T05:39:33+5:30
महाराष्ट्रात शिक्षकांना शासनाच्या विविध जाचक निर्णयामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध पदाधिकाऱ्यांकडून अपमानीत
बोर्ली -मांडला/मुरुड : महाराष्ट्रात शिक्षकांना शासनाच्या विविध जाचक निर्णयामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध पदाधिकाऱ्यांकडून अपमानीत व्हावे लागत आहे. ही परिस्थिती बदलवून आपला मान सन्मान टिकवायचा असेल तर संघिटत होणे गरजेचे आहे असे प्रतिप्रादन कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुरु ड तालुक्यातील नांदगाव येथे प्रचार प्रसंगी केले.
भारत देशाची उज्वल पिढी घडविण्यासाठी शिक्षक हे जीवाचा आटापीटा करून प्रामाणिक कामकारीत सेवा करत आहेत. मात्र महाराष्ट्रात शिक्षक बांधवांची नवनवीन शासन आदेशामुळे चिंताग्रस्त, विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यत शाळा,अ शैक्षणिक कामे आदींमुळे मानिसक तणाव वाढत आहे. पुढे ही भविष्याची शाश्वती नाही, अशी परिस्थिती राहिल्यास आपण आपल्या मुलांना शिक्षक कधीच बनवू शकणार नाही. विद्यार्थ्यांनाही शिक्षक बनण्याचा सल्लाही देऊ शकणार नाही. शिक्षण मंत्री विनोद तावडे हे म्हणतात की, यापुढे शाळेचा सर्व कारभार आॅनलाईन होणार आहे. आणि ज्यांना ते जमणार नाही त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी. या सर्व गोष्टी बदलणे ही काळाची गरज आहे. विना अनुदानित शाळांना देण्यासाठीसुमारे १३३ आंदोलने करावी लागली. त्याच वेळी महाराष्ट्रात देखील आंदोलन सुरु होती. त्या वेळी जाफ्राबाद(जालना) या ठिकाणच्या गजानन खरात नावाच्या शिक्षकाचा हृदयविकाराने बळी गेला. तरी शासनाने न्याय दिला नाही. विना वेतन काम करणार्या शिक्षणाच्या व्यथा गंभीर आहेत. त्यावेळी शिक्षक यांचा उद्रेक पाहून त्यावेळी शिक्षक मंत्री यांनी २० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन दिले मात्र ते आश्वासन हवेत विरले गेले. १९ सप्टेंबर २०१६ रोजी या विनाअनुदानीत शाळांना अनुदान देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला. त्यात सुद्धा जाचक अटी होत्या. त्यातील प्रमुख आट म्हणजे नववी आणि दहावीचा निकाल हा १०० टक्के लागला पाहिजे. बायोमेट्रिक विद्यार्थी आणि शिक्षक हजेरी यंत्र पाहिजे. तरच २० टक्के अनुदान मिळणार आदी जाचक गोष्टींचा शासनदेश आला. याचा धसका अनेक शिक्षकांनी घेतला. शाळा वाचवा शिक्षक वाचवा आणि आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सर्व शिक्षकांनी मिळून लढू या असेही आव्हान यावेळी त्यांनी केले. यावेळी म्हात्रे यांनी माजी जिल्हा प्रमुख तथा रायगड जिल्हा परिषदेचे प्रतोद महेंद्र दळवी यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. (वार्ताहर)