पोलादपूर : शालार्थ वेतन प्रणाली तांत्रिक बिघाडामुळे पगार मिळण्यात सतत अडचणी येणाऱ्या शिक्षकांना राज्य सरकारने दिलासा दिला असून, शिक्षकांचे मे व जुलैपर्यंतचे वेतन आॅफलाइन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांचे नियमित व थकीत वेतनही आॅफलाइन होणार आहे.राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे पगार आॅफलाइन केले जातात. मात्र, यंदा फेब्रुवारीमध्ये शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शिक्षकांना वेतन मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यावर आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य सरकारने दोन वेळा खास अध्यादेश काढून आॅफलाइन पद्धतीने पगार देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने शिक्षकांना दिलासा मिळाला. मात्र, शालार्थ वेतन प्रणालीतील तांत्रिक बिघाड पूर्णपणे दूर होईपर्यंत आॅफलाइन वेतन देण्याचा निर्णय घेण्यासाठी आमदार डावखरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शालार्थ क्रमांक मिळविण्यास पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शालार्थ क्रमांक मिळूनही आतापर्यंत आॅनलाइन वेतन न मिळालेल्या कर्मचाºयांना थकीत व जुलै २०१८पर्यंतचे वेतन आॅफलाइन मिळणार आहे.शिक्षकांना दिलासाकोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील हजारो शिक्षकांना अध्यादेशामुळे दिलासा मिळाला आहे. या अध्यादेशानुसार शालार्थ आयडीच्या प्रतीक्षेत असलेल्यांबरोबरच शालार्थ क्रमांक मिळूनही वेतन न मिळालेल्या शिक्षकांनाही आॅफलाइन पगार मिळणार आहे.
शिक्षकांना मिळणार आॅफलाइन वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 6:14 AM