उरण परिसरात कंटेनर हिटमुळे तापमानात वाढ; प्रदुषणही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 10:35 PM2022-12-24T22:35:06+5:302022-12-24T22:40:02+5:30

उरण परिसरात जेएनपीए,ओएनजीसी,नौदल, बीपीसीएल, जीटीपीएस यासारखे अनेक शासकीय प्रकल्प आहेत.

Temperature rise due to container hits in Uran area; Pollution also increased | उरण परिसरात कंटेनर हिटमुळे तापमानात वाढ; प्रदुषणही वाढले

उरण परिसरात कंटेनर हिटमुळे तापमानात वाढ; प्रदुषणही वाढले

googlenewsNext

- मधुकर ठाकूर

उरण : उरण आणि जेएनपीए परिसरात  दिडशेहुन अधिक असलेल्या कंटेनरयार्डमध्ये ठेवण्यात येत असलेल्या पत्र्याच्या लाखो कंटेनरच्या डब्ब्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.तापमान नियंत्रणात आणण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक कंटेनर यार्डमध्ये जागेत झाडे लावण्याची आवश्यकता आहे.मात्र याकडे कंपन्या आणि सिडको, जेएनपीए प्रदुषण विभागाकडून अक्षम्यपणे दुर्लक्षच होत असल्याने उरण परिसरात पर्यावरणाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

उरण परिसरात जेएनपीए,ओएनजीसी,नौदल, बीपीसीएल, जीटीपीएस यासारखे अनेक शासकीय प्रकल्प आहेत. या प्रकल्पावर आधारीत अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आणि रासायनिक प्रकल्पही उभारण्यात आल्या आहेत. उभारल्या जात आहेत.जेएनपीए तर आंतराष्ट्रीय दर्जाचे बंदर आहे.या बंदरातून वर्षीकाठी सरासरी सध्या तरी ७० लाख कंटेनर मालाची आयात-निर्यात होते.प्रचंड नफ्यात चालणार्‍या  या आयात-निर्यातीच्या व्यापारात अनेक कंपन्या कार्यरत आहेत.या कंपन्याची उरण परिसरात सुमारे दिडशेहून अधिक कंटेनर यार्ड, गोदामे आहेत.या गोदामामधुनच कंटेनर आणि कंटेनर मालाची जेएनपीए बंदरातून दररोज मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात होत असते.
 या रासायनिक प्रकल्प,कंपन्या आणि कंटेनर यार्ड उभारण्याच्या कामासाठी प्रचंड प्रमाणात माती-दगडाचे भराव टाकण्यात आले आहेत. या भरावाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर,टेकड्या आणि नैसर्गिक साधन सामुग्रींची आहुती पडली आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या नैसर्गिक र्‍हासाचे  दुष्परिणामही आता जाणवू लागले आहेत. त्यातच आता उरण आणि जेएनपीटी परिसरात कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात येणाऱ्या लाखो कंटेनरची भर पडली आहे. विविध कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात येत असलेले लाखोंच्या संख्येने पडुन असलेल्या कंटेनरचे पत्र्याचे डब्बे तापून वातावरणाचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आहे. मागील वर्षी जेएनपीटीचे चौथे बंदर कार्यान्वित झाले आहे.वर्षाकाठी ५० लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेल्या पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्याचे कामही पुढील वर्षात पुर्ण होणार आहे.त्यामुळे  जेएनपीटीचे चौथे बंदरही पुर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर जेएनपीटी बंदरातून वर्षाकाठी एक कोटी कंटेनरची हाताळणी आणि आयात-निर्यात होणार आहे.
 

उरण परिसरात सिडको प्लॅनिंग अ‍ॅथारिटी म्हणुन काम पाहाते.परिसरात सिडको अथवा महसुल विभागाच्या जमिनींवर होणार्‍या कंटेनर उभारणीला सिडकोच परवानगी देते.मग कंटेनर यार्ड उभारणीसाठी परवानगी देतानाच यार्डच्या एकूण क्षेत्रापैकी टेंपरेचर कंट्रोल आणि पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी ३० टक्के जागेवर झाडे लावण्याची अट सिडकोची आहे.मात्र यार्डमध्ये आयात निर्यात होणाऱ्या प्रत्येक कंटेनरच्या भाड्यापोटी इंच-इंच जागेसाठी भाडे आकारले जाते.इंच-इंच जागेच्या भाड्यापोटी मिळणार्‍या प्रचंड प्रमाणात मिळणार्‍या नफ्यामुळे कंपन्यांकडून झाडे लावण्याकडे अक्षम्य दुर्लक्षच केले जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने उरण, जेएनपीए परिसरात विविध कंटेनर यार्डंमध्ये लाखोंच्या संख्येने ठेवण्यात येणार्‍या कंटेनर डब्ब्यांमुळे तापमानात प्रचंड वाढ झाली असल्याची माहिती शासकीय यंत्रणेकडून दिली जात आहे.

उरण परिसरातील सिडको, महसूल,वन विभाग जेएनपीएच्या जागेत अधिकृत, अनधिकृत जागेवर दिडशेहून अधिक कंटेनर यार्ड, गोदामे, कंपन्या आहेत.यामध्ये निम्म्याहून अधिक अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत.यापैकी अनेक कंटेनर यार्डमध्ये झाडेच लावलेली दिसुन येत नाहीत. प्रत्येक कंटेनर यार्डधारकांनी जागेच्या क्षेत्रफळाच्या ३० टक्के जागेत झाडे लावण्याची अट परवानगी देतानाच घातली जाते.मात्र परवानगी देताना घातलेल्या अटींचे कोणीही पालन करताना दिसत नाहीत.

हद्दीत असलेल्या कंटेनर यार्ड, गोदामे, कंपन्यांकडून ग्रामपंचायती मालमत्ता कराची वसुली करते.मात्र अशा एकाही ग्रामपंचायतीला वृक्षलागवड करण्यासाठी कंपन्यांना सांगावेसे वाटत नाही.ही बाब अत्यंत दुदैवी आहे. कंटेनर यार्ड मालकांसोबत तहसिलदार,वनअधिकारी आणि काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक यांच्या अनेक वेळा बैठकाही पार पडलेल्या आहेत. मात्र त्यातून काही एक निष्पन्न झाले नसल्याची खंत उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी व्यक्त केली आहे.

सिडको, पर्यावरण, वन, महसूल विभाग कंटेनर यार्ड उभारण्यासाठी परवानगी देताना हिट प्रोटेक्शन व प्रदुषण रोखण्यासाठी ३० टक्के जागेत झाडे लावण्याची अट घालते.मात्र  झाडे लावण्यात आली आहेत की नाहीत याची कधीच खातरजमा केली जात नाही. याबाबत सिडकोचे प्लॅनिंग विभागही अद्याप अंधारातच चाचपडत आहे.मात्र प्लॅनिंग अ‍ॅथारिटी म्हणुन काम पाहाणार्‍या सिडकोच्या विविध विभागाकडून अक्षम्यपणे दुर्लक्षच होत असल्याने उरण परिसरात पर्यावरणाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

सिडकोची भुमिका बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी- 

कंटेनर हिट प्रोटेक्शन आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी कंटेनर यार्ड मालक झाडे लावण्यात दिरंगाई दाखवितात ही बाबच अतिशय गंभीर आहे. झाडे लावण्याची बाब बंधनकारक करण्यासाठी यापुढे कठोर उपाययोजना राबविण्याची नितांत गरज असल्याचे सिडकोच्या इस्टेट विभागाकडून सांगण्यात येत आहे.

कंटेनर हिट प्रोटेक्शन आणि पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी कंटेनर यार्ड,गोदामे, कंपन्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.यापुढे वृक्षारोपण आणि पर्यावरण संबंधित अटीशर्थींचे पालन केल्याची खातरजमा करूनच परवानगी दिली जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी दिली.

उरण परिसरात सर्वाधिक वनीकरण, वृक्षारोपण जेएनपीएकडून केले जात आहे.मात्र सीएफएसमध्ये
जागेची कमतरता व वृक्षारोपणामुळे कामकाजात अडथळे निर्माण होतात.यामुळेच वृक्षारोपणावर दुर्लक्ष होत असल्याची कबुली जेएनपीएचे मुख्य प्रबंधक तथा सेक्रेटरी जयवंत ढवळे यांनी दिली.

Web Title: Temperature rise due to container hits in Uran area; Pollution also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.