शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

मंदिराच्या घंटा वाजल्या, मात्र अबालवृद्धांना घरातूनच दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:53 AM

काेराेनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने जिल्हा प्रशासनाचा सल्ला 

 निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे वयाेवृद्ध नागरिक आणि लहान मुलांनी घरातूनच देवदर्शन घ्यावे, असे अलिखित आवाहन रायगडच्या जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी मंदिर, प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी करू नये, असेही सांगण्यात आले आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्र शासनाने मंदिरांमध्ये घातलेली प्रवेशबंदी अलीकडेच उठविल्यामुळे रायगड जिल्ह्यातील मंदिरांशी संबंधित असेलेले व्यावसायिक खूश झाले आहेत. धार्मिक पर्यटनामुळे जिल्ह्यात होणारी उलाढाल आता पूर्ववत होणार असल्याने मंदिर परिसरात लगबग दिसू लागली आहे. 

  जिल्ह्यात अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थाने आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणेश सुधागड आणि खालापूर तालुक्यांमध्ये आहेत. पाली येथील बल्लाळेश्वर आणि महड येथील वरदविनायक ही क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. गेले सात ते आठ महिने मंदिरे बंद असल्यामुळे या मंदिरांवर उभे असणारे अर्थकारण ठप्प झाले होते.  यांना मिळणार प्रवेशदर्शनासाठी आलेल्या भक्तांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. सॅनिटायजरही वापरणे गरजेचे आहे. मंदिरात दर्शनासाठी येताना घोळक्याने येऊ नये. भक्तांनी दर्शनासाठी रांगेत उभे राहताना अंतर ठेवून उभे राहावे. आजाराची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश. यांना प्रवेश नाही६५ वर्षांवरील भक्त, विविध आजारांनी ग्रस्त असलेले आणि १० वर्षांखालील मुलांना दर्शनासाठी गर्दीत आणू नये. सतत आजाराने ग्रस्त तसेच कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला असून, त्यांनी घरातून दर्शन घ्यावे.

मंदिर प्रवेशाबाबत नियमावलीधार्मिक स्थळी संबंधित व्यवस्थापनाने निर्धारित केलेल्या वेळेत भाविकांना प्रवेश.प्रार्थना स्थळांमध्ये येणारे भाविक आणि पर्यटकांनी मुखपट्टी वापरणे बंधनकारक.अंतर नियमाचे पालन आवश्यक, थर्मल स्कॅनिंग, जंतुनाशके ठेवणे आवश्यक. आजाराची कोणतेही लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश. थुंकण्यास सक्त मनाई, मंदिरात प्रवेश करताना हात-पाय स्वच्छ धुणे किंवा जंतुरोधकाने हातांचे निर्जंतुकीकरण बंधनकारक.धार्मिक स्थळी कोरोनाबाबत जनजागृती करणारी व्यवस्था व्यवस्थापनाने उभारावी.प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे प्रसादवाटपास मनाई.

नियमांचे उल्लंघन केल्यास होणार दंडराज्यभरातून लोक या ठिकाणी येतात. पूजापाठातून पुरोहितांना उत्पन्न मिळते. तेही ठप्प झाल्याने मंदिरांचे पुजारीही हवालदिल झाले होते. संत तुकारामांच्या भेटीने परमार्थमय झालेला खालापूर तालुक्यातील साजगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरही घंटानादाने भरून गेला आहे. तर दुसरीकडे मंदिर व्यवस्थापनाकडून विषेश खबरदारी घेतली जात आहे.