टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे तरु ण जखमी

By admin | Published: August 18, 2016 04:40 AM2016-08-18T04:40:48+5:302016-08-18T04:40:48+5:30

खोपोली -पेण मार्गावर आजिवली गावाच्या हद्दीत एका धाब्यानजिक डोनवत बाजूकडून मोटारसायकल वरून वावोशी येथे येत असताना वावोशीकडून खोपोली कडे भरधाव वेगात जाणाऱ्या

Tempo's bicycle hit; Both of them were injured | टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे तरु ण जखमी

टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे तरु ण जखमी

Next

वावोशी : खोपोली -पेण मार्गावर आजिवली गावाच्या हद्दीत एका धाब्यानजिक डोनवत बाजूकडून मोटारसायकल वरून वावोशी येथे येत असताना वावोशीकडून खोपोली कडे भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने या अपघातात दोन तरूण जखमी झाले.
बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डोनवत कडून मोटारसायकल क्र .एम.एच.०६ ए.व्ही.०५५७ वरून नारायण जाधव व गोरख वाघमारे रा.नंदनपाडा ता. खालापूर हे दोघे जण वावोशीकडे जात असताना त्याच वेळेस खोपोलीकडे भरधाव वेगात येणाऱ्या एम.एच.१२ -७९३५ या टेम्पोने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात मोटारसायकलवरील नारायण जाधव व गोरख वाघमारे (रा.नंदनपाडा) हे दोन आदिवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रु ग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवले आहे.
खापालूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शुभाष पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या अपघातात पसार झालेल्या टेम्पोचा येथील तरु णांना अर्धवट नंबर मिळाल्याने त्याचा तपास पोलीस करीत आहेत.
(वार्ताहर)

Web Title: Tempo's bicycle hit; Both of them were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.