गाव-पाड्यांत पाच दिवसांनी टँकर; टंचाईग्रस्त गावांत पाणीपुरवठ्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:14 AM2019-05-12T00:14:58+5:302019-05-12T00:15:22+5:30

तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे.

 Ten days after village-pedestrian tankers; Difficulty in water supply in scarcity-hit villages | गाव-पाड्यांत पाच दिवसांनी टँकर; टंचाईग्रस्त गावांत पाणीपुरवठ्यात अडचणी

गाव-पाड्यांत पाच दिवसांनी टँकर; टंचाईग्रस्त गावांत पाणीपुरवठ्यात अडचणी

Next

- विजय मांडे

कर्जत : तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे. शासनाने सुरू केलेले टँकर पाच ते आठ दिवसांनी टंचाईग्रस्त गावात आणि वाडीत पोहचत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पाण्याच्या शोधासाठी भटकावे लागत असल्याने त्यांच्या उद्योग व्यवसायावरही परिणाम होत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे किमान महिनाभर टंचाईग्रस्त भागातील जनतेचे टँकरने पाणी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निर्णय घेऊन, तालुक्यात ३ गावे आणि १५ आदिवासी वाड्यांना टँकरचे पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय जिल्हाधिकारी यांनी १८ मार्च २०१९ रोजी घेतला. त्यासाठी मनोज ओसवाल यांच्या मालकीचा (एमएच ०२ के ७००२) आणि कान्हू मालू खडके यांच्या मालकीचा ( एमएच ४६ ई ४२३२) टँकरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे दोन्ही टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात ४ एप्रिलपासून हे दोन टँकर तालुक्यातील टंचाईग्रस्त मोग्रज, धामणी, पिंगळस या तीन गावांना तसेच १५ आदिवासी वाड्यांना टँकरने पाणी पुरविणार आहे. त्यात भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, जांभूळवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, खानंद, सागाचीवाडी, धामणदांड, भूतीवली, बोरीचीवाडी, चिंचवाडी, पालीधनगरवाडी, मोरेवाडी आणि ताडवाडी अशा १५आदिवासी वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला.
सरकारी दर परवडत नसल्याने टँकर ठेकेदार आपली वाहने देतो, पण प्रत्यक्ष पाणीपुरवठा करताना वेळेवर करीत नाही. गेल्या महिनाभरात पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने ज्या गावात - वाड्यात टँकर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्या ठिकाणी १५ आदिवासी वाड्या आणि ४ गावांत टँकर दिवसाआडही गेलेला नाही. टँकर मंजूर झालेल्या आदिवासी वाड्यात कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्ते पाठवून चौकशी सुरू केली. त्यावेळी शासनाकडून पाच ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे संतप्त आदिवासी समाजाच्या कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांनी १४ मेपासून कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
कर्जत तालुक्यात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने टंचाईग्रस्त गावे-वाड्यातील ग्रामस्थांनी टँकरची मागणी करण्यास सुरुवात केली होती. १२ मार्च २०१९ रोजी पहिल्यांदा टँकरची मागणी करणारे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पोहचले होते. मार्चअखेर टँकरची मागणी करणाºया प्रस्तावाची संख्या १८ वर गेली.

शासनाकडून मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. आम्हाला हक्काचे पाणी देखील शासन देत नसल्याने आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे सनदशीर मार्गे आंदोलन करावे लागेल.
- जैतू पारधी, अध्यक्ष,
आदिवासी ठाकूर कातकरी समाज

३ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी भोपळेवाडी, जांभूळवाडी, मॉग्रेज ग्रामपंचायतीमधील नंदकरपाडा येथे टँकर द्यावेत, असा प्रस्ताव प्रलंबित आहे.

Web Title:  Ten days after village-pedestrian tankers; Difficulty in water supply in scarcity-hit villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी