शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

अपघातात दहा प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:44 AM

वाकण-पाली-खोपोली या राज्य मार्गावर गेली कित्येक वर्षांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे

राबगाव/पाली : वाकण-पाली-खोपोली या राज्य मार्गावर गेली कित्येक वर्षांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे. सध्या मार्गाचे दुपदरीकरणाचे काम जोरात सुरू असून कामात ठेकेदाराकडून कोणतीच सुरक्षितता बाळगली जात नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी रोजी पाली-खोपोली मार्गावर नानोसे गावाच्या हद्दीत सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर ठोकर झाली. अपघातात टेम्पो ट्रॅव्हलमधील दहा प्रवासी जखमी झाले असून ते सर्व खोपोलीतील रुग्णालयात उपचार घेत आहेत.पालीकडून खोपोलीच्या दिशेन येणारा टेम्पो नानोसे गावच्या हद्दीत पोहचला असता पालीकडे येणारा ट्रक चालकाने रस्त्याचे रु ंदीकरणाचे काम चालू असताना बेदरकारपणे ट्रक चालवून टेम्पो ट्रॅव्हलला धडक दिली. यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलमधील खंडू शांताराम सावंत, देवेंद्रकुमार दुबे, अमोल शिवाजी फडतरे, संतोषसिंग केदारसिंग रजपूत, प्रदीपकुमार मुखर्जी, राहुल मनोहर जाधव, मनोजकुमार कैलासचंद मोहती, शंकर लक्ष्मण कडू, सी.व्ही. मॅथ्यू, नागेश अशोक बहिरट आदी दहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खोपोली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पाली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.