शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी दहा हजार फराळाचे बॉक्स

By वैभव गायकर | Published: October 09, 2023 4:28 PM

आर्मी ऑफिसर्स पदार्थांची चाचणी करून प्रत्यक्ष हायर कॅम्प बॉर्डरवरच्या जवानांना ही पार्सल पाठवतील.

लोकमत न्युज नेटवर्क पनवेल: भारत विकास परिषदने मातृभूमीच्या विविध सीमांचे रक्षण करणार्‍या सैनिकांना 10 हजार फराळाचे बॉक्स सीमेवर पाठवण्याचे लक्ष्य भारत विकास परिषद पनवेल ठेवले आहे.  यासाठी 600 किलो चिवडा, 600 किलो शेव, 450 किलो चकली आणि 10 हजार लाडू आले आहेत. 

 येत्या दोन दिवसांत हे सर्व पदार्थ बॉक्समध्ये भरून सोमवार ते गुरुवार पर्यंत रेल्वे पार्सल तसेच एयर कार्गो मार्फत भारतीय लष्कराच्या आर्मी कॅम्पवर पोहचवण्यात येतील त्यानंतर आर्मी ऑफिसर्स पदार्थांची चाचणी करून प्रत्यक्ष हायर कॅम्प बॉर्डरवरच्या जवानांना ही पार्सल पाठवतील. या सर्व प्रक्रियेसाठी अंदाजे 10  ते 15 दिवस लागतात. सैनिक हो तुमच्‍यासाठी' हा भारत विकास परिषद, पनवेल शाखेचा प्रमुख प्रकल्प आहे, जो गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे आणि या उपक्रमामधे उत्तरोत्तर प्रगती होत आहे.

या उपक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भेट देत नितिन कानेटकर, डॉ. किर्ती समुद्र,ज्योती कानेटकर, सुबोध भिडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेत कौतुक केले. यंदाच्या वर्षी सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी 10 हजार फराळाचे बॉक्स पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.पनवेल शाखेची स्थापना 2019 साली झाली आणि 2020 मध्ये दिवाळीच्या निमित्ताने, भारत विकास परिषद ने या नवीन प्रकल्पाची सुरुवात केली व संकल्पनेला आपले ध्येय बनवले. सीमेवरील आपल्या सैनिकांना काही मिठाई (लाँग शेल्फ-लाइफ पौष्टिक लाडू) पाठवण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022