थळ येथील तलवार मैदानावर एम डी फाऊंडेशन आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा 

By निखिल म्हात्रे | Published: February 25, 2024 08:14 PM2024-02-25T20:14:33+5:302024-02-25T20:15:26+5:30

यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी, अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष निगडे, डॉ. नार्वेकर राजाराम हुलवान यांच्यासहित इतर मान्यवर उपस्थित होते.

Tennis Cricket Tournament organized by MD Foundation at Talwar Maidan, Thal | थळ येथील तलवार मैदानावर एम डी फाऊंडेशन आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा 

थळ येथील तलवार मैदानावर एम डी फाऊंडेशन आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा 

अलिबाग - अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी राजमळा येथे महेंद्रशेठ दळवी फाऊंडेशन पुरस्कृत दमदार आमदार प्रीमिअर लिग २०२४ च्या आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी, अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष निगडे, डॉ. नार्वेकर राजाराम हुलवान यांच्यासहित इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार दळवी म्हणाले की, एम डी फाऊंडेशन आयोजित पर्व तिसरे पण क्रिकेट मधील पर्व पहिलेची सुरवात दिनांक 4 मार्च ते 7 मार्च 2024 दरम्यान अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीतील राजमळा येथील तलवार मैदानावर रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिके असलेली स्पर्धा म्हणून खेळाडूंना एक वेगळी दिशा देणारी स्पर्धा ठरणार आहे. या खेळातून स्थानिक खेळाडूंना हक्कांचे व्यासपिठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, असे गौरवोद्गार आमदार महेंद्र दळवी यांनी काढले.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट खेळाला मिळालेली व्याप्ती आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी त्यांना दर्जेदार आणि व्यावसायिक व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) मिळण्याच्या दृष्टीकोनातून रायगड जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धा विशेषतः ग्रामीण भागातील या सर्व खेळाडूंना एकत्रित करून त्यांच्याकरीता ही स्पर्धा आयोजित करणे अत्यावश्यक आहे या दृष्टीकोनातूनच एम डी फाऊंडेशनने. या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
 

Web Title: Tennis Cricket Tournament organized by MD Foundation at Talwar Maidan, Thal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग