लाखोंच्या अपहार प्रकरणी तासगावकरांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:55 AM2018-04-18T01:55:33+5:302018-04-18T01:55:33+5:30
तालुक्यातील चांदई येथे असलेल्या सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विश्वस्तांनी संगनमताने भविष्यनिधीचा सुमारे ८७ लाख रु पयांचा अपहार केल्याने त्यांच्यावर कर्जत पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत : तालुक्यातील चांदई येथे असलेल्या सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विश्वस्तांनी संगनमताने भविष्यनिधीचा सुमारे ८७ लाख रु पयांचा अपहार केल्याने त्यांच्यावर कर्जत पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे कर्जत तालुक्यात यादवराव तासगावकर इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, तासगावकर पॉलिटेक्निक आणि यादवराव तासगावकर स्कूल आॅफ बिझनेस मॅनेजमेंट अशी तीन महाविद्यालये आहेत. महाविद्यालयातील २९१ कर्मचाऱ्यांच्या पगारातून कर्मचारी भविष्यनिधी खाते क्र मांक-१ आणि कर्मचारी निवृत्ती वेतन योजना खाते क्र मांक- १०मध्ये भरणे आवश्यक होते. मात्र, अध्यक्ष नंदकुमार वाय. तासगावकर आणि विश्वस्त राजेश वाय. तासगावकर या दोघांनी संगनमताने भविष्य निधीच्या ८६ लाख ४४ हजार ८६६ रु पयांचा अपहार केला असल्याची तक्रार भविष्य निधी निरीक्षक गिरीश विठ्ठलराव डेकाटे यांनी केली आहे. याबाबत कर्जत पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.