ताम्हिणी घाटात भीषण अपघात, १५० ते २०० फूट उंचावरून खाली कोसळली गाडी, 3 जणांचा मृत्यू

By जमीर काझी | Published: August 20, 2022 10:19 PM2022-08-20T22:19:05+5:302022-08-20T22:24:16+5:30

गाडीत एकूण 6 प्रवासी होते. यांपैकी 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Terrible accident in Tamhini Ghat; The car fell down 150 feet | ताम्हिणी घाटात भीषण अपघात, १५० ते २०० फूट उंचावरून खाली कोसळली गाडी, 3 जणांचा मृत्यू

फोटो - ताम्हिणी घाटात भीषण अपघात होऊन गाडी खाली कोसळलेली दिसत आहे. पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झालेला दिसत आहे.

googlenewsNext

रायगड - माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-माणगाव महामार्गावरील ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत सुमारे १५०-२०० फूट उंचावरून ही गाडी खाली कोसळली आहे. 

ही गाडी पुण्याकडून मानगावच्या दिशेने येत होती. गाडीत एकूण 6 प्रवासी होते. यांपैकी 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी इर्टिका असल्याचे समजते. 

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांची टीम तत्काळ रुग्णवाहिकेसह घटना स्थळी रवाना झाली असून रात्री उशिरा पर्यंत रेस्कूचे काम सुरू होते.

Web Title: Terrible accident in Tamhini Ghat; The car fell down 150 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.