शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

आपत्ती व्यवस्थापनची पेणमध्ये कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 12:27 AM

चार धरणांतील पाण्याचा विसर्ग निर्माण करतो पूरपरिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कपेण : मान्सूनचे आगमन वेळेवरच होणार असल्याने रायगड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जागी झाली आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी यासंदर्भात व्हिडिओकॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन अधिकारी वर्गाशी आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार हे गृहीत धरून तातडीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबतीत आढावा घेतला.

पेणमध्ये हेटवणे आंबेघर शहापाडा व बाळगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून हंगामात पाण्याचा होणारा विसर्ग यामुळे भोगावती, बाळगंगा, नद्यांच्या पातळीत होणारी धोकादायक वाढ यामुळे पेण ग्रामीण भागातील पूरपरिस्थितीसाठी हाताळणे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या आवाक्याबाहेर असते. यामुळे पेणच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. यावर्षी मान्सून हंगामात हवामानशास्त्र विभागाने सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानुसार जून महिन्यात १०६ टक्के, जुलैमध्ये ९९ टक्के, ऑगस्ट महिन्यांत, ९७ टक्के व सप्टेंबर महिन्यात ११६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर दुसरीकडे समुद्राला १८ दिवस हायटाइड उधाण भरतीच्या ४.७८ मीटर पाणी पातळीत वाढ होईल. नद्यांच्या धोकादायक पूररेषेत भोगावती नदीकाठी पेण शहर, अंतोरे, नवघर, पाटणोली, सापोलीबेडी, कणे, भोगावती नदीचा प्रवाहासमोर कणे गाव येत असल्याने या खाडीकिनारचा संरक्षक बंधारा वेगवान प्रवाहाच्या धडकेने फुटतो आणि अखंड गाव पुराने वेढले जाते. या नदीपात्रात आंबेघर व हेटवणे धरणाच्या पाण्याचा विसर्ग व आपत्कालीन परिस्थितीत धरणाचे उघडले जाणारे दरवाजे अशा परिस्थितीत या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने आताच संभाव्य उपाययोजना केल्या पाहिजेत. दुसरीकडे दक्षिण बाजूकडील शहापाडा धरणातील पाणीसाठा लवकर जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात ओव्हरफ्लो होऊन ते पाणी वाशी नाका मार्गे कणे खाडीत येत असल्याने परिस्थिती भयानक बनते. रहदारीचे मार्ग बंद होतात. यात आणखी भर पडते ती पावसाळी येणाऱ्या उधाण भरतीच्या पाणीपातळीची भरतीची पाणीपातळी नद्यांच्या प्रवाहाला अडविणे आणि पुराच्या पाण्याची पातळी होत्याच नव्हते करते. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसमोर ही मोठी जबाबदारी आहे.

बाळगंगा नदीकिनारी उपाययोजना आवश्यक बाळगंगा नदीकिनारी खरोशी दूरशेत, जिते तर पातालगंगा नदी प्रवाह दुष्मी, खारपाडा, जिते, यावे, जोहे, तांबडशेत, दादर या गावांना वेणीत जात अरबी समुद्रात विसावते. धरणे, नद्यांच्या पट्ट्यातील येणार पाणी आणि समुद्राला येणारी उधाण भरती यांचा ताळमेळ योगायोग जुळून येत असल्याने पेण शहर व ग्रामीण भागातील नदी व खाडी किनारी भागात मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Raigadरायगड