अलिबाग येथील बैठकीला वरिष्ठ नेत्यांचीच पाठ
By admin | Published: July 17, 2017 01:22 AM2017-07-17T01:22:24+5:302017-07-17T01:22:24+5:30
भाजपाच्या युवा मोर्चाच्या वतीने अलिबाग येथे आयोजित केलेल्या बैठकीला वरिष्ठ नेत्यांनीच पाठ फिरविल्याने कार्यकर्त्यांचा
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : भाजपाच्या युवा मोर्चाच्या वतीने अलिबाग येथे आयोजित केलेल्या बैठकीला वरिष्ठ नेत्यांनीच पाठ फिरविल्याने कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. समारोपाच्या सत्राला भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी हजेरी लावली.
जिल्ह्यात युवा मोर्चाची कार्यव्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, युवती प्रमुख, युवती सहप्रमुख, तालुका मंडलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, युवती प्रमुख, शहर अध्यक्ष, शहर सरचिटणीस यांची बैठक रविवारी हॉटेल रविकिरण येथे घेण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी व संघटनेचे बळकटीकरण करण्यासाठी भाजपाचे गृहनिर्माण तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हे वरिष्ठ नेते भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते. मात्र तेच या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. त्यामुळे उपस्थित असलेल्या नेत्यांनीच युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मात्र वरिष्ठांच्या अनमोल मार्गदर्शनाविनाच त्यांना घरी परतावे लागले. यावेळी रायगड जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्र ांत पाटील, विजय चव्हाण अन्य पदाधिकारी उपस्थित होते.