स्मशानभूमीत सेंद्रिय फळभाज्यांसह मसाल्यांचा सुगंध दरवळतोय...; ‘मुनोत मुक्तिधाम’मध्ये वनराई; वाघिलकरांची स्वखर्चाने देखभाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 08:50 AM2023-12-21T08:50:50+5:302023-12-21T08:51:01+5:30

स्मशानभूमी म्हटलं की, ओसाड रान असे चित्र असते. मात्र, पनवेलमधील जैन समाजाच्या मुनोत मुक्तिधाम ट्रस्टच्या तक्का येथील स्मशानभूमीत वनराई फुलवली आहे.

The aroma of spices along with organic fruits and vegetables wafts through the graveyard...; Forestry in 'Munot Muktidham'; Maintenance of tigers at own expense | स्मशानभूमीत सेंद्रिय फळभाज्यांसह मसाल्यांचा सुगंध दरवळतोय...; ‘मुनोत मुक्तिधाम’मध्ये वनराई; वाघिलकरांची स्वखर्चाने देखभाल

स्मशानभूमीत सेंद्रिय फळभाज्यांसह मसाल्यांचा सुगंध दरवळतोय...; ‘मुनोत मुक्तिधाम’मध्ये वनराई; वाघिलकरांची स्वखर्चाने देखभाल

वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : मुनोत मुक्तिधाम या स्मशानभूमीत गेल्यानंतर आपण एखाद्या वनराईत आल्याचा भास होत आहे. येथे सेंद्रिय भाजीपाला, फळांच्या झाडांसह दालचिनी, जायफळ आणि तेजपत्ता या मसाला झाडांचा दरवळ मनाला प्रसन्न करून जात आहे.

स्मशानभूमी म्हटलं की, ओसाड रान असे चित्र असते. मात्र, पनवेलमधील जैन समाजाच्या मुनोत मुक्तिधाम ट्रस्टच्या तक्का येथील स्मशानभूमीत वनराई फुलवली आहे. या स्मशानभूमीचा कायापालट येथे काम करणारे गणेश वाघिलकर यांनी केला असून, ते स्वखर्चाने या वनराईची देखभाल करीत आहेत.
गाढी नदीच्या तीरावर असलेल्या या स्मशानभूमीत २०१३ पासून वाघिलकर यांनी १५ ते २० गुंठ्यांत अनेक प्रकारची झाडे लावून नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे ही सर्व झाडे ऑरगॅनिक पद्धतीने वाढविली आहेत. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणाऱ्या शेणी, फुले आदींचा वापर ते खतासाठी करीत आहेत.

वनराईत कशाची लागवड? 
वांगी, मिरची, टोमॅटो, कारली, शेवगा या भाज्यांसह गवती, ब्रह्मकमळ, कृष्णकमळ, सोनचाफा ही फुलझाडेही येथे आहेत. केळी, पपई, पेरू, बोर, जांभूळ, स्टार फळ, फणस, आवळा आदी फळांची झाडे आहेत. दालचिनी, तेजपत्ता, जायफळ आदी मसाल्यांची झाडे येथे आहेत. मघाई, पान, रक्तचंदन, सफेद चंदन, नारळ यासह प्राजक्ता, बेल, शमी, दुर्वा यांच्याही वेली येथे आहेत.

खाण्यासाठी फळभाज्यांचा वापर
वनराईतील फळे, फुले तसेच फळभाज्या वाघिलकर आपल्या घरात वापरतात. विक्री करीत नाहीत. कोणी मागितले तर त्याला आवर्जून देतात.

स्मशानभूमीत कधीच कोणाला जावेसे वाटत नाही. मात्र, तक्का येथील मुनोत मुक्तिधामचा गणेश वाघिलकर यांनी कायापालट केला आहे. येथे गेल्यानंतर मन प्रसन्न होते. शहरातील प्रत्येक सोसायटीत अशी वनराई फुलवली तर सोसायटीतील वातावरणही प्रसन्न होईल.
- बिपिन मुनोत, ट्रस्टी, मुनोत मुक्तिधाम, पनवेल

Web Title: The aroma of spices along with organic fruits and vegetables wafts through the graveyard...; Forestry in 'Munot Muktidham'; Maintenance of tigers at own expense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.