हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 05:59 AM2024-10-10T05:59:42+5:302024-10-10T06:00:48+5:30

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना लाडक्या बहिणी कार्यक्रमातून बाहेर पडत होत्या, अर्धे सभागृह खाली झाले होते. मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले  कटआउटही महिलांनी तेथेच टाकले. 

the bubble of ego was burst by the people after haryana election 2024 result cm eknath shinde criticizes india alliance | हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका

हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, माणगाव : हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेने फोडला आहे. तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलं. लोकसभेला विरोधकांनी फसवणूक करून मतदान घेतले, अशी टीका इंडिया आघाडीवर करून जनता दरबारामध्ये आम्ही आमचा हिशेब सांगायला तयार आहोत, महायुतीने केलेल्या कामांची पोचपावती येणाऱ्या निवडणुकीत द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माणगाव येथे केले. लाडकी बहीण योजनेच्या शेवटच्या वचन कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी तिजोरीत पैसा नाहीत, अशी सरकारची बदनामी सुरू केली आहे. ही खोटी बदनामी थांबवावी, असे सांगून योजनेला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन यावेळी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला व्हिडीओ क्लीपद्वारे शुभेच्छा दिल्या.

पेट्रोलियम व नैसर्गिकवायू मंत्रालय समितीचे अध्यक्ष खा. सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ. भरत गोगावले, आयुक्त अनुपकुमार आदी उपस्थित होते.

आदिती तटकरे यांच्यावर स्तुतिसुमने 

कार्यक्रमात अजित पवार यांनी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मुली दिलेल्या संधीच सोनं करतात, असे सांगून आदिती आपल्या खात्याचा चोख कारभार करीत असल्याचे सांगितले.

 कार्यक्रमावर पावसाचे सावट  

मुख्यमंत्री लाडकी योजना कार्यक्रमाअगोदर पाऊस पडल्याने सर्वत्र चिखल झाला होता. ठिकठिकाणी पाणी साचले होते. वीजवाहिन्यादेखील पाण्यात होत्या. 

भाषण सुरू असतानाच बहिणी पडल्या बाहेर 

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना लाडक्या बहिणी कार्यक्रमातून बाहेर पडत होत्या, अर्धे सभागृह खाली झाले होते. मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले  कटआउटही महिलांनी तेथेच टाकले. 
 

Web Title: the bubble of ego was burst by the people after haryana election 2024 result cm eknath shinde criticizes india alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.