मृत्यूची 'दरड', अश्रूंचा पाऊस; बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 08:26 AM2023-07-21T08:26:22+5:302023-07-21T08:26:38+5:30

२४ तासांनंतरही ढिगारे जैसे थे, हुंदका अन् आक्रोशाने आसमंत हळहळला

The 'crack' of death, the rain of tears; The affected will be permanently rehabilitated | मृत्यूची 'दरड', अश्रूंचा पाऊस; बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार सरकार

मृत्यूची 'दरड', अश्रूंचा पाऊस; बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार सरकार

googlenewsNext

जमीर काझी

इर्शाळवाडी (जि. रायगड) : वार बुधवार. रात्रीचे ११ ते ११:३० वाजलेले... आदिवासी पाड्यावर कोसळत्या पावसात अन् गार वाऱ्यात ४९ कुटुंबं गाढ झापेत होते... तेवढ्यात मातीचा मोठा ढिगारा डोंगरावरून घरंगळत आला अन् त्याने अर्ध्याहून अधिक गाव गिळले. मदतीसाठी हाक देण्याचीही अनेकांना संधी मिळाली नाही.. १६ जणांना या दरडीने गिळले...

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मृत्यूचा हा डोंगरच कोसळला. दरड कोसळताच पळत सुटलेले, धडपड करून आपला व इतरांचा जीव वाचवलेले आणि मदतकार्यादरम्यान बाहेर काढलेले १०३ जण या भीषण दुर्घटनेत वाचले. पण, अजून १००हून अधिक नागरिक ढिगाऱ्यात असल्याची भीती आहे. एनडीआरएफसह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील मदत व बचाव पथकांनी धाव घेत अनेकांना वाचवले. 

नेमके काय घडले?
मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डोंगराचा वरचा कडा तुटून या वाडीवर पडला. दोन्ही भागांकडून मोठमोठे दगड कोसळल्याने ४९ घरांपैकी मधल्या भागातील सात ते दहा घरे वगळता सर्व घरे राडारोड्याखाली दबली.
किती मोठा थर?
दरडी कोसळून घरांवर सुमारे ३० ते ३५ फुटांचा दगड-मातीचा थर साचला आहे. त्यामुळे हा ढिगारा काढणे सद्य:स्थितीत अशक्यप्राय बनले आहे.

मदतकार्यात प्रचंड अडथळे 
घटनास्थळी पोहोचल्यावर एनडीआरएफच्या जवानांशिवाय अन्य कोणातही मदत करण्याची ताकद उरली नव्हती. अन्य बचाव पथक व औद्योगिक कारखान्यातून मागविण्यात आलेल्या मजूर वर्ग यांच्याकडील साधनेही अपुरी पडत होती. ही वाडीवर पोहोचण्यास निसरडी पायवाट, कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले. अखेर संध्याकाळी मदतकार्य थांबवण्यात आले. 

पायथ्याशी नियंत्रण कक्ष
n घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानिवलीपर्यंत वाहने जाऊ शकतात. तेथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. 
n खासगी डॉक्टरांचीही मदत टीएचओने बोलावली आहे. एनडीआरएफचे पथक, स्निफर डॉक स्क्वॉडही घटनास्थळी पोहोचून कार्य करीत आहे. डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

 

 

 

बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार 
लोकमत न्यूज नेटवर्क । अलिबाग (जि. रायगड) : 
बचावकार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवण्यास प्राधान्य  दिले जात असून, त्याचे नियोजन  झाले आहे.  कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भातही विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सांगितले. दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली होती; परंतु, ती खराब हवामानामुळे पोहोचू शकलेली नाहीत, असे ते म्हणाले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित आहेत. अधिकारी, बचाव पथकाच्या संपर्कात मी रात्रीपासून होतो, असे शिंदे यांनी सांगितले. बचावकार्य करणारे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. येथे मदत आणि बचावकार्य अवघड आहे. यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. 

Web Title: The 'crack' of death, the rain of tears; The affected will be permanently rehabilitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.