शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

सख्खे शेजारी, पक्के वैरी...; भिंतीवरून उचलून नेला मृतदेह, अंत्ययात्रेलाही दिला नाही रस्ता! पोसरी गावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 6:38 AM

वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद असल्याने शेजाऱ्याच्या अंत्ययात्रेलाही रस्ता न दिल्याची धक्कादायक घटना रसायनी-वासांबेतील नवीन पोसरी गावात घडली. त्यामुळे मृतदेह उचलून भिंतीवरून नेण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली.

मोहोपाडा : वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद असल्याने शेजाऱ्याच्या अंत्ययात्रेलाही रस्ता न दिल्याची धक्कादायक घटना रसायनी-वासांबेतील नवीन पोसरी गावात घडली. त्यामुळे मृतदेह उचलून भिंतीवरून नेण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली. मरणान्ती वैराणी असे सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीत मृत्यूनंतरही वैर कायम राहिल्याने ग्रामस्थांनीही संताप व्यक्त केला.  

खारकर आळीमध्ये खंडू हाल्या खारकर आणि रघुनाथ शंकर पाटील शेजारी-शेजारी राहतात. खारकर आणि इतर शेजाऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता पाटील यांच्या दारातून जातो. खंडू खारकर यांचे ४ जानेवारीला निधन झाले. अंत्ययात्रा नेण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी रघुनाथ पाटील यांना तात्पुरता रस्ता खुला करण्याची विनंती केली. मात्र, त्यांचा मुलगा नीतेश यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे नातेवाइकांनी भिंतीवरून खंडू खारकर यांचा मृतदेह उचलून एकमेकांकडे देत अंत्ययात्रा कशीबशी पुढे नेली.

ग्रामस्थांत संताप- या प्रकारामुळे ग्रामस्थांत संताप आहे. प्रशासनाने जर वेळीच लक्ष घातले असते, तर ही वेळ आली नसती. - माणुसकीला काळिमा फासणाऱ्या रघुनाथ पाटील आणि त्यांच्या मुलाच्या वागणुकीमुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. - आता तरी तहसीलदारांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काही महिन्यांपासून हा रस्ता बंद आहे. तो पुन्हा खुला व्हावा, यासाठी खारकर आळीतील ग्रामस्थांनी वासांबे ग्रामपंचायत, खालापूर पंचायत समिती, खालापूरच्या तहसीलदारांकडे अर्ज दिले होते. खालापूर पंचायत समितीजवळ उपोषणही केले होते. गट विकास अधिकाऱ्यांनी रस्ता सुरू करण्याबाबत आश्वासनही दिले होते. 

वहिवाटीचा जुना रस्ता त्यांनी बंद केला आहे. यासाठी आम्ही उपोषणही केले होते. त्यावेळी तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले होते. मात्र, तरीही हा रस्ता बंद आहे. माझ्या वडिलांच्या अंत्ययात्रेसाठीही त्यांनी हा रस्ता खुला केला नाही. भिंतीवरून उचलून मृतदेह न्यावा लागला. त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी.- परेश खारकर, मुलगा 

टॅग्स :RaigadरायगडDeathमृत्यू