कोकणातील जनतेचं मन जाणणाऱ्या नेत्याचा अंत; नीलम गोऱ्हेंनी घेतली मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2024 11:58 PM2024-03-31T23:58:55+5:302024-03-31T23:59:09+5:30
कोकणातील जनतेची नाळ जाणणाऱ्या मीनाक्षी पाटील होत्या. त्यांनी महाराष्ट्र सरकार १९९९ मध्ये त्यांनी बंदरे आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे राज्यमंत्रीपद काही काळ सांभाळले होते
रायगड - दिवंगत शेकाप नेत्या मीनाक्षी पाटील यांचं २९ मार्च रोजी दुःखद निधन झालं होतं. आज शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची त्यांच्या अलिबाग येथील घरी जाऊन सांत्वन पर भेट घेतली. यावेळी गोऱ्हे यांनी मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
कोकणातील जनतेची नाळ जाणणाऱ्या मीनाक्षी पाटील होत्या. त्यांनी महाराष्ट्र सरकार १९९९ मध्ये त्यांनी बंदरे आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे राज्यमंत्रीपद काही काळ सांभाळले होते. आपली अभ्यासपूर्ण भाषणे, ओघवती वक्तृत्वशैली यांमुळे त्या उत्तम वक्त्या होत्या. डॉ.गोऱ्हे यांनी त्यांच्या आठवणींना उजळा भेटीत उघड केला. यावेळी आ. जयंत पाटील, सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील, राजन पाटील आणि बहीण नंदा पाटील व इतर महिला मित्र परिवार उपस्थित होते