मधुकर ठाकूरउरण : एक डिसेंबरपासून पुढील वर्षभरासाठी भारत जी-२० देशाचे अध्यक्षपद भूषविणार आहे. वर्षभराच्या कार्यक्रमाअंतर्गत जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह वर्षभरात देशातील युनोस्कोच्या ४० जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देणार आहेत. बैठका घेऊन आपला राष्ट्रीय मूर्त वारसा जगासमोर योग्य पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याची सुरुवात १२ ते १५ डिसेंबरपासून वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश असलेल्या महाराष्ट्रातील जागतिक प्रसिद्धीच्या एलिफंटा लेण्यांपासून करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण मुंबई विभागाचे अधिक्षक डॉ. राजेंद्र यादव यांनी दिली.
देशातील देशातील ४० एएसआय स्मारकांना युनेस्कोचा जागतिक वारसा लाभला आहे. ही स्मारके देशाच्या वैविध्यपूर्ण मूर्त वारसा म्हणून जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधींसाठी मुख्य आकर्षण असणार आहेत. या वर्षात जी-२० शिखर परिषदेच्या देशांचे अध्यक्षपद भारत भूषवत आहे. भारतीय प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील ४० जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देणार आहेत. या भेटी दरम्यान बैठका घेऊन आपला राष्ट्रीय मूर्त वारसा जगासमोर योग्य पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.
याची सुरुवात १२ ते १५ डिसेंबरपासून वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश असलेल्या जागतिक प्रसिद्धीच्या एलिफंटा लेण्यांपासून करण्यात येणार आहे. एलिफंटा बेटावर सलग तीन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेत भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह शिखर परिषदेचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.
त्यानंतर १६-१७ जानेवारीला महाराष्ट्रातील पुणे येथील आगाखान पॅलेस, शनिवारवाडा, शिवनेरी किल्ला व १३-१४ फेब्रुवारी रोजी अजंठा लेणी, एलोरा लेण्यांना भेटी देणार आहेत. वर्षभरात देशातील गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ,तेलंगणा, बिहार, ओडिशा, गोवा,दिव,लडाख आदी राज्यांतील वर्ल्ड हेरिटेज यादीतील पर्यटन स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण मुंबई विभागाचे अधिक्षक डॉ.राजेंद्र यादव यांनी दिली.