शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

शहाळ्यावरील देवीच्या मुखवट्याचे नागाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 5:21 PM

रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

उरण : दरवर्षी नवरात्रौत्सवात घट स्थापना केली जाते. घट स्थापना करताना बहुतेक ठिकाणी शहाळ्यावर देवीचे मुखवटे सजवून तयार केलेले घट बसविले जातात.असे हे रंगवून सजावट केलेले शेकडो घट उरण तालुक्यातील नागावात तयार केले जातात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून नागाव हे देवीच्या मुखवट्याचे गाव म्हणून नावारूपास येऊ लागले आहे. रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

नवरात्रौत्सवात घट स्थापना केली जाते.नारळाच्या शहाळ्यावर देवीचे मुखवटे रंगवून,सजवून तयार केलेल्या मुखवट्याच्या घटांना उरण परिसरात मागणी असते.असे हे शहाळ्यावर रंगकाम केलेले देवीच्या मुखवट्याचे तयार करण्याचे काम उरण तालुक्यातील  मोठे नागाव येथील राहणारे दिलीप यशवंत पाटील यांचे कुटुंब मागील ४० वर्षापासून करीत आहेत. अनेक ठिकाणी घरगुती अथवा सार्वजनिक मंडळे देवीची  मूर्ती सोबत घट किंवा मुर्तीऐवजी शहाळ्यावरील रेखाटलेल्या मुखवट्यालाच अधिक पसंती देतात.

ओल्या शहाळ्याच्या एका बाजूकडील भाग काही प्रमाणात सुरीने कोरुन काढतात. त्याभागावर सुरेख रंगकाम केले जाते.देवीचे आकर्षक डोळे,कान,नाक , मुख तयार केले जाते .त्यावर मंगळसूत्र ,कर्णफुले , नथ असे अलंकार घातले जातात.शहाळ्यावरही देवीचेडोळे, चेहरा आणि रंगकाम करताना कसब पणाला लावले जाते.त्यातुनच देवीचा आकर्षक मुखवटा आकार घेतो. असे शहाळ्यावरील कलाकुसरीच्या देवीच्या मुखवट्याच्या उरण परिसरात अनेक ठिकाणी खूप मागणी असते.त्यामुळे दरवर्षी शंभरहून अधिक देवीचे शहाळ्यावरील देवीचे मुखवटे तयार केले जातात.शहाळे,रंगकाम, हुबेहूब दिसणारे आकर्षक नकली अलंकार आणि मेहनतीने तयार केलेले शहाळ्यावरील कलाकुसरीचे मुखवटे अगदी नगण्य २०० रुपये दराने विक्री केली जाते.

पारंपारिक वसा जोपासण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे.यासाठी कुटुंबातील सदस्यांचीही मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले. नागावातील नाईक कुटुंबही शहाळ्यावरील कलाकुसरीचे मुखवटे तयार करण्यात अगदी माहीर आहे.पारंपारिक परंपरा टिकविण्याची त्यांच्यासह कुटुंबांची धडपड वाखाणण्याजोगी आहे.यासाठी पैसे न घेताही शहाळ्यावरील देवीचे मुखवटे घटासाठी भाविकांना भक्तीच्या भावनेतून दिले जात असल्याचे नाईक कुटुंबाकडून सांगितले जात आहे. यामुळे मात्र मागील काही वर्षांपासून नागाव हे शहाळ्यावरील देवीच्या मुखवट्याचे गाव म्हणून नावारूपास येऊ लागले आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री