- वैभव गायकरपनवेल - रायगड जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था इतर जिल्ह्याच्या तुलनेत सुरळीत नाही.जिल्ह्याचे आरोग्य सांभाळण्यासाठी हवे असलेले इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाही.तसेच लागणारे मनुष्यबळ अपुरे असल्याची खंत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पनवेल येथे 28 रोजी व्यक्त केली.
तीन महिन्यापूर्वीच जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार स्वीकारलेला देवमाने यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे.जिल्ह्यात लहान मुलांचे आयसीयू केवळ अलिबाग येथे आहे.अलिबाग च्या धर्तीवर रोहा,कर्जत,महाड,श्रीवर्धन याठिकाणी देखील अशाप्रकारची आरोग्य सेवा उभारण्याची गरज असून शासनाला तसे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे देवमाने यांनी स्पष्ट केले.खालापूर,चौक येथील ग्रामीण रुग्णालय आणि उरण येथील 100 खाटांच्या रुग्णालयाबाबत देखील लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.लोकप्रतिनिधींनीचा देखील चांगले सहकार्य जिल्हा आरोग्य प्रशासनाला मिळत असल्याचे डॉ देवमाने यांनी सांगितले.
सहा ठिकाणी डायलेसिस सुविधाडायलेसिसच्या रुग्णांना लांबवर प्रवास करून डायलेसिस केंद्र गाठावे लागते.अशावेळी जिल्ह्यातील सहाही उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु करण्याची गरज आहे.तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे.शासनाचे आरोग्य विभाग देखील याबाबत सकारात्मक आहे.त्यामुळे लवकरच जिल्ह्यात डायलेसीस केंद्र वाढतील असा विश्वास डॉ देवमाने यांनी व्यक्त केला.