शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

मुंबई-गोवा महामार्ग वर्षभरात पूर्ण करणार, नितीन गडकरींनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 9:46 AM

Mumbai-Goa highway: म्हसळा-दिघी-पोर्ट राष्ट्रीय महामार्ग, इंदापूर तळा आगरदांडा महामार्ग, पुणे-रायगड जिल्हा सीमा ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग, कासू ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदापूर येथे झाले.

माणगाव : म्हसळा-दिघी-पोर्ट राष्ट्रीय महामार्ग, इंदापूर तळा आगरदांडा महामार्ग, पुणे-रायगड जिल्हा सीमा ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग, कासू ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदापूर येथे झाले. यावेळी मुंबई-गोवा महामार्ग येत्या वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. कोकणातील १८ सागरी महामार्ग बांधून पूर्ण केले आहेत. आदिती तटकरे यांनी मागणी केलेल्या सागरी महामार्गाचा भारतमाला २ मध्ये समावेश करून पूर्ण करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांच्या गडकिल्ल्यांच्या बाबतीतील सर्व प्रस्ताव मंजूर केले आहेत. सरकारी जमीन वापरून ट्रक टर्मिनल्स उभारण्यात येतील. पुणे ते जेएनपीटी रेल्वे नेण्याची गरज आहे. कोळी बांधवांसाठी १०० नॉटिकल आत जाणारे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. ते कोकणातील कोळी बांधवांना दिल्यास ब्लू इकॉनॉमिकमुळे कोकणात समृद्धता येणार आहे. कोकणाच्या विकासात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नसून मुंबई-गोवा महामार्गासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे आश्वासनही गडकरी यांनी दिले आहे.या सोहळ्याला पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, आ. भरत गोगावले, आ. रवींद्र पाटील, आ. रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय मुख्य अभियंता तथा क्षेत्रीय अधिकारी राजीव सिंह, राज्य महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्गाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड उपस्थित होते. गडकरी नव्हे हे तर रोडकरी - तटकरेनितीन गडकरी म्हणजे दिल्लीतील महाराष्ट्राचा अभिमान आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे गडकरी यांच्यामुळेच पूर्णत्वास गेला.  अनेक रस्त्यांना गडकरींच्या माध्यमातून महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. एवढेच नाही तर निधीही उपलब्ध करून कामे पूर्ण केली आहेत. यामुळे गडकरींची  ओळख गडकरी म्हणून नव्हे तर रोडकरी म्हणून देखील निर्माण झाली आहे, अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी कौतुक केले.

‘महामार्गाचे काम १२ वर्षे रखडले याचे दु:ख’ पनवेल : मुंबई-गोवा महामार्ग ही कोकणची लाइफलाइन आहे. २०१० पासून सुरू झालेले काम २०२२ म्हणजेच १२ वर्षांतही पूर्ण झाले नसल्याचे दुःख असल्याची कबुली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.२९३५ कोटी किमतीच्या ४५ किमी लांबीच्या जेएनपीटी बंदर  जोडरस्ता प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तसेच १२०० कोटींच्या ५.८८८ किमी लांबीच्या कळंबोली जंक्शन व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पूर्वेकडील प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा पनवेलमध्ये पार पडला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते.  नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला वाॅटर टॅक्सीने जोडण्याचा मानस आहे. याकरिता पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घ्यावा. एकत्रित चर्चा करून यामधून नक्कीच जलमार्गाला चालना देणारा पर्याय उभा करू, असेही गडकरी यांनी सांगितले.कोकणातील जागा संपादित करणे हे जगाच्या पातळीवर सर्वात अवघड काम असल्याचे गडकरी यांनी आपल्या मिश्कील शैलीत सांगितले. एका जमिनीत अनेकांचे वाद उद्भवतात. विशेष म्हणजे या वादावरून राजकारण्यांचे शिष्टमंडळ आमच्याकडे येतात असे म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गkonkanकोकण