अलिबाग : रोहा शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या अनैतिक शारीरिक संबंध व्यवसायावर धडक कारवाई करून पर्दाफाश केला आहे. तीन पिडीत महिलांची रोहा पोलिसांनी सुटका केली असून संजय हरिश्चंद्र वाघमारे वय ५१, राहणार नागोठणे कोळीवाडा ता. रोहा याला पोलिसांनी अटक केली आहे.
रोहा हे सांस्कृतिक, धार्मिक वारसा जपणारे, थोर विभूतीचे शहर आहे. असे असताना शहरात अनैतिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होते. शहरात अनैतिक शारीरिक व्यवसाय चालतो अशी चर्चा पसरली होती. परंतु तो कुठे आणि कधी चालतो याची चाहूल कोणाला लागत नव्हती. परंतु रोहा पोलिसांना याची चाहूल लागताच. १८ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रोहा पोलीस यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीराम लॉजवर सापळा रचला. शहरातील दमखाडी येथे श्रीराम लॉजवर पोलिसांनी गुप्त धाड टाकून वेश्या व्यवसायाचे पितळ उघडे पडले.
रोहा पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी संजय वाघमारे याला अटक केली आहे. तीन पिडीत महिलाना ही ताब्यात घेतले आहे. आरोपी हा महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांना आश्रय देत होता. त्यानंतर त्याच्याकडून स्वतःच्या फायद्यासाठी देहविक्री करीत होता. बाहेरील शहरातील ग्राहकांना आणून महिलांशी अनैतिक संबंध आरोपी प्रस्थापित करीत होता. यातून स्वतच्या आर्थिक फायदा आरोपी वाघमारे करीत होता.
पीडित महिलेची सुटका करून आरोपी संजय हरिश्चंद्र वाघमारे याच्यावर भा द वि कलम ३७० सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५७ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. अधिक तपास रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर करीत आहे.