अलिबाग - रायगड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध पोलीस यंत्रणेला अक्षरशः कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात मंजूर पदांपैकी ३२७ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता पोलीस विभागाला जाणवत आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची २७ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात दिवसाला ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे.
मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील २७ पोलीस ठाण्यांमध्ये दिवसाला ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र विभागासाठी पोलीस अधिक्षक ते पोलीस उपनिरिक्षकांची एकूण २४७ पदे मंजूर आहेत. मात्र यामधील २७ पदे रिक्त आहेत. ही पदे भरावीत यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून राज्य सराकरकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. तर ३०० पोलीस हवालदार, पोलीस नाईक, सहाय्यक फौजदार, पोलीस शिपाई यांची कमतरता पोलीस विभागाला जाणवत आहे.
327 कर्मचार्यांची पदे रिक्त -रायगड जिल्हा पोलीस दलात 43 पोलीस अधिकार्यांव्यतिरिक्त 227 पोलीस कर्मचार्यांची पदेही रिक्त आहेत. 2 हजार 317 पोलीस कर्मचार्यांची पदे मंजूर असून, त्यामध्ये 2 हजार 2090 पदे भरण्यात आली आहेत. रिक्त पोलीस कर्मचार्यांमध्ये सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल यासह इतर पदांचा समावेश आहे.
पोलीस दल रिक्त अधिकारीपद - मंजूर पदे - भरलेली पदे - रिक्त पदेपोलीस अधिक्षक - १ - १ - ०अप्पर पोलीस अधिक्षक - १ - १ - ०पोलीस उपविभागीय अधिकारी - ९ - ९ - ०पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक : २३६ : २०९ : २७ पोलीस कर्मचारी : २०८१ : १७८१ : ३००